करवीरच्या लेकींची रग्बी खेळात उत्तुंग भरारी :- दोघींची भारतीय संघात आशियाई स्पर्धेसाठी निवड

0
276

आंबा प्रतिनिधी = उज्वला लाड

कोल्हापूर सारख्या कुस्ती व फुटबॉल प्रेमी जिल्ह्यासाठी रग्बी नावाचा खेळ नवीनच आहे. सर्वसामान्यांना फारसा या माहित नसलेल्या खेळा मध्ये मात्र करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द या छोट्याशा गावातील वैष्णवी दत्तात्रय पाटील व कल्याणी कृष्णात पाटील या दोघींनी भारतीय संघात आशियाई स्पर्धेमध्ये निवड होण्याचा मान मिळविला.

या दोघींची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आणि थक्क करणारी आहे.
रग्बी हा खेळ वेगळ्या प्रकारचा असला तरी कोल्हापूरच्या रांगड्या मातीला साजेसा असा आहे. कारण खेळामध्ये विलक्षण च पळाई बरोबर शारीरिक ताकतीचा वापर केला जातो. दोघींच्याही घरची आर्थिक परिस्थिती सधन म्हणावी अशी नाही.

शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या या दोघीही कोल्हापुरात शालेय शिक्षण घेत असताना या खेळाच्या सरावासाठी प्रचंड मेहनत घेत होत्या.
वैष्णवी पाटील हिने कोल्हापूर ते पाडळी हे वीस किलोमीटर अंतर सायकलवरूनच शाळेला ये जा करण्यास सुरुवात केली व त्याचबरोबर या खेळाचे प्रशिक्षण घेत सराव चालू ठेवला.

राष्ट्रीय प्रशिक्षक दीपक पाटील व जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अमर सासणे यांच्या सहकार्याने या खेळात तिने प्राविण्य मिळवले. 7 राष्ट्रीय आणि 3 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने चमकदार कामगिरी केली.

तिचे वडील रिक्षा चालक असून तिच्याकडून कामगिरी करण्यात आल्यामुळे तिचे हार्दिक अभिनंदन…
अशीच गाथा तिची मैत्रीण कल्याणी कृष्णात पाटील ची सुद्धा आहे. तिची वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहेत व घरची परिस्थिती बेताची आहे . ती न्यू कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना या खेळाचा सराव चालू ठेवला.

परंतु आर्थिक अडचणीमुळे तिला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. तरीसुद्धा ती जिद्द हरली नाही. पैशाच्या अडचणीमुळे कॉलेज सोडून जाण्याचा निर्णय तिने एक वेळ घेतला होता , ही बाब प्र शिक्षक दीपक पाटील व प्राध्यापक सासणे सर यांना समजल्यानंतर त्यांनी प्रिन्स बोर्डिंग तर्फे तिचा वर्षभराचा खर्च उचलला व तिने प्रशिक्षण चालू ठेवले.


अशा परिस्थितीत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दोघीही पाडळी ते कोल्हापूर प्रवास सायकलवरून करत असत व येथे सराव करत असत . या दोघींच्या परिश्रमाचे चीज झाले व दोघींचीही आशियाई रग्बी स्पर्धेसाठी निवड झाली.
करवीरच्या या दोन सुपुत्री स्पर्धेसाठी सध्या चीनला रवाना झालेल्या आहेत , त्यांच्या या जिद्दीला सलाम व पुढील उत्कृष्ट कामगिरीसाठी शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here