कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर : तुमच्या काळात मराठा समाजाला आरक्षण का दिला नाही? तुमच्या काळात तुम्ही गोट्या खेळाय गेला होता का? की पत्ते खेळायला गेला होता का? अशी विचारणा माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली आहे.
प्रत्येक जण जात काखेत मारून आंदोलन करायला निघाला आहे, सरकारने आरक्षणासंदर्भात खरी भूमिका मांडावी, अशा शब्दात आरक्षणासंदर्भात सदाभाऊ खोत यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
सदाभाऊ खोत यांनी राज्यावर टांगत्या असलेल्या दुष्काळाच्या टांगती तलवार असल्याने भाष्य केले. ते म्हणाले की, पावसाने दडी मारल्याने पिके करपली आहेत.
त्यामुळे सरकारने तातडीने पंचनामा करून चालूपीक कर्ज वसुली थांबवावी, अशी मागणी केली आहे. सगळ्याच पक्षांमध्ये साखर कारखानदार, त्यामुळे दोन साखर कारखानांमधील अंतराचा नियम बदलला नाही.
साखर कारखान्यांच्या हवाई अंतरची फाईल आमच्या काळात चर्चेला आली होती, पण त्यावेळी विरोधी पक्षाला विचारात घेवून निर्णय घ्यावे लागतील, असं म्हणत ती फाईल बाजूला ठेवली.
छोटेमिया रोहित पवारांनी झोनबंदी केल्यानंतर का आंदोलन केलं नाही?
राज्यात ऊसाला झोनबंदी करण्यात आल्यानंतर राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती. सदाभाऊ खोत म्हणाले की, 14 सप्टेंबर रोजी झोन बंदी अधिसूचना काढलेली होती.
त्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या मनात या अधिसूचनांबद्दल राग होता. देशपातळीवर साखरेच्या किमती वाढत आहेत. अशात काही साखर कारखानदारांनी साखर महासंघामार्फत सरकारला झोनबंदी करण्याबाबत विनंती केली.
सरकारने देखील हे मान्य करून झोनबंदी जाहीर केली. यानंतर शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झाला. त्यानंतर अधिसूचना रद्द करण्याचा जीआर काढण्यात आला, यासाठी सरकारचे अभिनंदन करतो.
सरकारने राज्य राबणाऱ्या माणसाकडून बघून चालवावे, लुटारू पाहून निर्णय घेवू नका. घटकपक्ष हे साखर कारखानदार याच्याशी संबंधित नाहीत. वसंतदादा साखर संघ हा साखर सम्राटाचा असून हा संघ बडेमियांच्या ताब्यात आहे.
सहकार मंत्र्यांना वाटलं आपले भाऊबंद अडचणीत येतील, म्हणून असा निर्णय घेतला होता. रोहित दादा म्हणजे नव्या पिढीचे अभ्यासू विचारवंत आहेत. छोटेमिया रोहित पवारांनी झोनबंदी केल्यानंतर का आंदोलन केलं नाही? दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतर काढायला रोहित पवार यांनी आंदोलन केले, तर आम्ही देखील आंदोलनात सहभागी होवू, असे सदाभाऊ म्हणाले.