एक तारीख एक घंटा (एक तारीख एक तासस्वच्छता श्रमदान उपक्रम जिल्ह्यातील सर्व 1278 ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात आला

0
93

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूर : ग्रामपंचायतीकडील कचरा व्यवस्थापनाचा ताण कमी करण्यासाठी नागरिकांनी कचरा वर्गीकरण घरातच करावे, प्लास्टीकचा वापर कमी करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सकाळी 10 ते 11 या वेळेत ‘एक तारीख एक घंटा’ (एक तारीख एक तास ) हा स्वच्छता उपक्रम . राबविण्यात आला. या उपक्रमात नागरीकांनी लाखोंच्या संख्येन सहभागी होत हा उपक्रम यशस्वी केला.

कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती, करवीर व ग्रामपंचायत उंचगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत उंचगाव येथे स्वच्छता श्रमदान उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

एक तारीख एक घंटा (एक तारीख एक तास) या स्वच्छता मोहिमेची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली.

यावेळी स्वच्छता कर्मचारी यांचा सन्मान प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील व सरपंच मधुकर चव्हाण यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेश चौगुले, पंचायत समिती सदस्य सुनिल पोवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

स्वच्छता ही सेवा अंतर्गत कचरा मुक्ती या विषयावर तयार केलेल्या गीताचे सादरीकरण जिल्हा परिषद, कर्मचारी कला मंचच्या वतीने करण्यात आले. तसेच स्वच्छतेचे महत्व या विषयावर यावेळी दोन शालेय विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

ग्रामपंचायतीच्या वतीने याठिकाणी शाहीरी पथकामार्फत जनजागृतीचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

स्वच्छता श्रमदानासाठी जमलेल्या सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेवून श्रमदानास सुरुवात केली. यासाठी चार स्वच्छता पथके तयार करुन गावातील चार प्रमुख ठिकाणी मंगेश्वर कॉलनी, मंगेश्वर मंदिर परिसर, शांतीनगर, मणेर मळा येथे स्वच्छता श्रमदान मोहीम राबविण्यात आली. या श्रमदान मोहिमेत 4 ट्रॉली, 3 घंटागाडी कचरा संकलन करण्यात आला.

श्रमदानासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट तसेच जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष तज्ज्ञ, सल्लागार, गट विकास अधिकारी पंचायत समिती विजय यादव, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत, गट समुह समन्वयक, करवीर पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी, उंचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, उपसरपंच वैजयंती यादव, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय धनगर, सर्व सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, बचत गट महीला, शिक्षक विद्यार्थी यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

एक तारीख एक घंटा (एक तारीख एक तास ) या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आवाहन केले होते, याला प्रतिसाद देत या उपक्रमात जिल्ह्यातील लाखो नागरिक सहभागी झाले.

जिल्ह्यातील सर्व 1 हजार 025 ग्रामपंचायतींमध्ये 1 हजार 278 ठिकाणी या उपक्रमाचे आयोजन करण्यातड आले होते.

15 सप्टेंबर पासून सुरु झालेल्या स्वच्छता ही सेवा ह्या पंधरवडा कार्यक्रमामध्ये गावातील पर्यटन स्थळे व सार्वजनिक ठिकाण या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

शालेय स्तरावर विविध स्पर्धा, सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी तसेच स्वच्छता रन असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले. या सर्व कार्यक्रमांमध्ये तालुकास्तरावर खासदार व आमदार महोदय सहभागी झाले.

या विविध उपक्रमामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी पंचायत समिती स्तरावरील गटविकास अधिकारी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामसेवक तसेच स्वयंसेवी संस्था ,तरुण मंडळे, नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here