आज पाच राज्यातील निवडणूकांचे बिगुल वाजणार

0
96

प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आज जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाने आज १२ वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पुढील वर्षी होणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल मानली जात आहे. छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आहे तर मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे.

तेलंगणात बीआरएस आणि मिझोराममध्ये एमएनएफ सारखे प्रादेशिक पक्षाचे सरकार आहे.छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

याशिवाय राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोराममध्ये एकाच टप्प्यात निवडणुका जाहीर करणे शक्य आहे. नोव्हेंबरच्या मध्यापासून निवडणूक प्रक्रिया सुरू होऊ शकते, जी डिसेंबरच्या मध्यापर्यंत सुरू राहू शकते.

निवडणूक आयोग १० ते १५ डिसेंबर दरम्यान मतदानाची तारीख निश्चित करण्याची शक्यता आहे. २०१८ मध्ये, निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा ६ ऑक्टोबर रोजी जाहीर केल्या होत्या. २०१८ मध्ये छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका झाल्या.

मध्य प्रदेश, मिझोराम, राजस्थान आणि तेलंगणामध्ये एकाच टप्प्यात निवडणुका झाल्या. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या १८ जागांसाठी पहिल्या टप्प्यात १२ नोव्हेंबरला मतदान झालं, तर दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबरला विधानसभेच्या ७२ जागांसाठी मतदान झालं.

त्याचप्रमाणे मध्य प्रदेश आणि मिझोराममध्ये २८ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात, तर राजस्थान आणि तेलंगणामध्ये ७ डिसेंबरला मतदान झाले. ११ डिसेंबर २०१८ रोजी पाचही राज्यांतील निवडणुकीची मतमोजणी एकाच वेळी झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here