संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत बंद झालेली पेन्शन पुन्हा सुरू होणार

0
86

प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा

कागल: संजय गांधी निराधार योजनेतील विधवा, दिव्यांग निराधार लाभार्थ्यांची मुले २५ वर्षांची होईपर्यंत किंवा शासकीय, निमशासकीय, खाजगी नोकरी मिळेपर्यंत ही पेन्शन मिळायची. यापैकी जे पहिल्यांदा मिळेल तोपर्यंत लाभार्थींना लाभ देण्यात यावा, असा शासन निर्णय होता.

ही जाचक अट रद्द करण्यासाठी चंदगडचे आमदार राजेश पाटील, कागल तालुका संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष प्रताप उर्फ भैया माने, प्रविणदादा भोसले, शशिकांत खोत ,सदाशिव तुकान, राजू आमते(मुरगुडकर), नारायण पाटील, साताप्पा कांबळे यांनी पाठपुरावा केला.

कोल्हापूर जिल्ह्ययाचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी शासन निर्णयात बदल करून संजय गांधी निराधार योजनेतील विधवा व दिव्यांग,निराधार लाभार्थींच्या मुलांची २५ वर्षाची अट रद्द केली.

तसेच दिनांक ०५/ १०/ २०२३ चे शासन परिपत्रक काढून दिनांक ०१/०४ /२०२२ पासून ज्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थींची मुले २५ वर्षाची झाले कारणाने अनुदान बंद करण्यात आले होते.

अशा लाभार्थींचे मुळ प्रस्ताव (पूर्वी केलेले अर्ज) ग्राह्य धरून सदर लाभार्थ्यांचे अनुदान तात्काळ सुरू करण्याबाबत सर्व जिल्हाधिका-यांना आदेश दिलेले आहेत. तसेच; ०१/०४/२०२२ पूर्वी ज्यांचे वरील कारणास्तव अनुदान बंद झाले आहे, त्यांनी आपले नवीन अर्ज तहसील कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन प्रताप माने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here