रिपाइं (आ) कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने नूतन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सन्मान.

0
123

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील

महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री नाम. हसन मुश्रीफ यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या मंगल हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कोल्हापुरातील महायुतीचे प्रमुख नेते यांची 2024 निवडणूक व पुढील कामांच्या नियोजना संदर्भात कसबा बावड्यातील शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली.

यावेळी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने त्यामध्ये सहभागी होत हसन मुश्रीफ यांचा पालकमंत्री झाल्याबद्दल सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.

यावेळी उत्तमदादा कांबळे व नाम.हसन मुश्रीफ यांनी विविध विषयांवर चर्चा केली. या सत्कारदरम्यान कोल्हापूरचे खासदार संजयदादा मंडलिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय.पाटील, खासदार धैर्यशील माने, आम.विनय कोरे,आम.प्रकाश आवडे, भाजपचे सुरेश हाळवणकर,रिपाइं राज्य सचिव मंगलराव माळगे, करवीर तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाशीकर ,कामगार आघाडी शहराध्यक्ष प्रदीप मस्के, अण्णासो आवळे,अतुल सडोलीकर, विजय कांबळे, वैभव प्रधान,अमित काळे, प्रज्योत सूर्यवंशी,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here