प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर : मराठा आरक्षण मागणीसाठी आज कोल्हापूर शहरातील विविध पक्ष संघटनांनी एकत्र येत मिरजकर तिकटी येथे जेलभरो आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
या जेलभरो आंदोलनात प्रजासत्ताक संघटनेचे निमंत्रक दिलीप देसाई, कॉमन मॅन संघटनेचे बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख संजय पवार,रिक्षा सेनेचे राजू जाधव, उदय भोसले, आर के पोवार,आदिल फरास, सुनिता पाटील,वैशाली महाडिक किसन कल्याणकर,मंजीत माने यांच्यासह विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.