सुळकूड -(कागल) येथील दादासाहेब मगदुम स्मारक समिती संचलीत लक्ष्मीबाई पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज रोप्य महोत्सव वर्षे साजरा करत आहे.
प्रचीन नाणी जवळून पाहताना विद्यार्थीच्या चेहऱ्यावर एक वेगळा अनुभव पाहत असल्याचे समाधान दिसत होते.
यांचे औचित्य साधून सुळकूड चे सुपुत्र शेखर कोणे यांच्या कडे असनारे ६०० पेक्षा अधिक एत्याहासिक दुर्मिळ नाणी व देशविदेशातील चलन विद्यार्थीना पाहता यावे व इतिहास कालीन नाणी त्या नाण्यांचा इतिहास विद्यार्थीना समजावे म्हणून प्रदर्शन भरविण्यात आले होते.
संपूर्ण कार्यक्रम चे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक सुनील स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रदर्शन चे उद्घाटन युवा उद्योजक ओंकार घाटे यांच्या हस्ते करण्यात आले.
सर्वाचे स्वागत व प्रास्ताविक सुभाष खोत यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनाजी चौगुले यांनी केले
तर कार्यक्रमाच्या शेवटी आभार उज्वला मोरे यांनी मांडले
प्रदर्शन पाहण्यासाठी कुमार विद्या मंदिर, कन्या विद्या मंदिर , सुळकूड हायस्कूल सुळकूड चे सर्व विद्यार्थी,व सुळकूड येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते