कोकरूड -प्रतापराव शिंदे
किवळ – कराड येथील सुपुत्राची दैदिप्यमान कामगिरी, सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा)
जागतिक स्तरावर अतिशय खडतर अशी समजली जाणारी
‘आयर्नमॅन’ ही ट्रायथलॉन शर्यत असुन या जागतिक स्तरावरील स्पर्धेत किवळ ता. कराड जि. सातारा येथील डॉ. दिग्विजय तानाजीराव साळुंखे चमकदार कामगिरी करीत भारत देशाचे व महाराष्ट्राचे नाव झळकावले आहे.
दिनांक ७ आक्टोबर २०२३ रोजी लँगकावी- मलेशिया येथे हि स्पर्धा पार पडली. संपूर्ण डोंगराळ भाग, अवघड घाट व दमट हवामानामुळे खेळाडूंना खडतर भागातून जावे लागते.
या स्पर्धेत जगभरातून अनेक नामांकित खेळाडू सहभागी होत असतात भारतातून या स्पर्धेसाठी १६ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. परंतु दिग्विजय साळुंखे व ईतर आठ खेळाडूंना ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करता आली.
डॉ. दिग्विजय साळुंखे यांनी मुंबई येथे वैद्यकीय व्यवसाय संभाळत या स्पर्धेसाठी गेली तीन वर्षे मुंबई येथे सराव करित आहेत. या जागतिक स्तरावरील स्पर्धेत डॉ.दिग्विजय साळुंखे यांनी १५ तास ५७ मिनिटांची वेळ नोंदवत शर्यत पूर्ण करताच उपस्थित भारतीय नागरिकांनी, खेळाडूंनी टाळ्यांचा कडकडात करित त्यांचे अभिनंदन केले.
डॉ. दिग्विजय साळुंखे यांना आई सौ. संगिता साळुंखे, वडील तानाजीराव साळुंखे, पत्नी डॉ. विश्वात्मिका साळुंखे सुरवातीपासून पाठिंबा मिळाला. तसेच
कोल्हापूर येथील ट्रायथॅलॉन प्रशिक्षक पंकज राऊळे ,
मुंबईतील ॲथलेटिक्स कोच मिस्टर सॅमसन सिक्वेरा , जिमचे प्रशिक्षक सुनील कुडवा, जलतरणचे प्रशिक्षक प्रणेश घरत आदिंसह अलिबागचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. डॉ. दिग्विजय साळुंखे यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.