राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये तळंदगे गावची सुकन्या आणि जय जगन्नाथ कुस्ती संकुल तळंदगे ची कुस्तीगीर अमृता बापु धनगर हिने 14 वर्षाखालील फ्री स्टाईल 33 किलो वजनी गटात सलग पाच काटा कुस्त्या करुन प्रथम क्रमांक पटकावला .
आणि ती सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. महाराष्ट्रातून सुवर्ण पदकाला गवसणी घालणारी अमृता ही एकमेव खेळाडू ठरली आहे. यामुळं गावात प्रचंड उत्साहचे वातावरण झाल आहे.
अमृताचे वडील श्री. बापू धनगर हे सुद्धा माजी कुस्तीपटू आहेत, तिच्या या ऐतिहासिक यशातून गावकऱ्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने गावचे सरपंच श्री. संदीप पोळ यांनी ग्रामपंचायत च्या जाहीर पत्रका द्वारे अमृता च्या यशात संपूर्ण गावाला सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या मिरवणुकीत स्टँड सर्कल, आणि बिरदेव तरुण मंडळा मार्फत JCB द्वारे पुषवृष्टी करण्यात आली.
यात बिरदेव तरुण मंडळ आणि जय जगन्नाथ संकुल यांनी सहभाग घेतला व ही संपूर्ण गावातून ही मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीत गावातील नागरिक मोठ्या संखेने सहभागी झालेले दिसले.
गावच्या शेजारील पट्टन कोडोली येथील खेळाडू यशोदा मोटे हिने सुद्धा राष्ट्रीय स्पर्धेत 30 किलो गटात तिसरा क्रमांक मिळून कास्य पदक मिळवले बद्दल तिलाही या मिरवणुकीत मोठ्या अभिमानाने गावकऱ्यांनी सहभागी करून घेतले.
गावचे सरपंच श्री. संदीप पोळ यांनी तिच्या या यशाबद्दल बोलताना जय जगनाथ तालीम संकुल माजी वस्ताद, आणि तिचे वडील, तिचे कोच श्री. मुकुंद वाडकर यांचे आभार व्यक्त करून संपूर्ण गाव त्यांचे ऋणी असल्याचे सांगितले.
याबाबत बोलताना गावचे सरपंच श्री संदीप पोळ यांनी सांगितले की ..खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी तळंदगे ग्रामपंचायत मार्फत राज्यस्तरावर प्रथम येणाऱ्या खेळाडूस 21 हजार रुपये आणि राष्ट्रीय स्तरावर प्रथम येणाऱ्या खेळाडूस 51 हजार रुपये बक्षीस मधल्या काळात जाहीर करण्यात आलेले आहे.
अमृता व्यतिरिक्त इतर दोन खेळाडूंनी ही या योजनेचा लाभ घेतलेला आहे. गावातून या यशावर मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. या मिरवणुकीत ग्रामपंचायत मार्फत उपसरपंच व सर्व सदस्य, विविध गणेश मंडळे, विविध संस्थांचे पदाधिकारी, क्रिकेटचे खेळाडू आणि बिरदेव तालीम मंडळ व जय जगन्नाथ कुस्ती संकुल यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
अमृताच्या यशामुळे जय जगन्नाथ कुस्ती संकुलाची चर्चा आणि कौतुक सर्व स्तरातून होताना दिसत आहे.