या महिन्यातील पहिल्या दिवशी म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते या दिवशी प्रत्येक घरामध्ये घट बसवला जातो
हा घट म्हणजे पूर्वीच्या काळी शेतकऱ्यांसाठी एकप्रकारची आपल्या शेतामध्ये कोणते पीक भरघोस उत्पन्न देणार याचे मोजमाप देणारी एक प्रकारची प्रयोगशाळाच म्हणावी लागेल
पूर्वीच्या काळी बी बियाणे यांची दुकाने अस्तित्वात नव्हती तेव्हा शेतकऱ्यांना आपल्या जमिनीतून उत्पन्न घेतलेले बियाणेच पुढील वर्षासाठी वापरावे लागत होते यामध्ये कोणते पीक जोमाने येणार हे पाहण्यासाठी प्रत्येक घरामध्ये घट बसवले जायचे
यामध्ये पळसाच्या पानाची पत्रावळी तयार करून त्यावरती माती घेऊन आपल्या शेतामध्ये पिकवलेले धान्य एकत्रित करून त्याच्या मधोमध एक मातीचे मडके पाण्याने भरून ठेवले जाते
यामुळे मातीच्या मडक्यातील पाण्याचा ओलावा मातीमध्ये राहतो यामधून कोण कोणत्या बियाणांमधून पीक जोमाने अंकुरते याची चाचणी घेतली जायची की ज्यामध्ये शेतकरी आपल्या पिकाचा तसेच बियाणांचा दर्जा स्वतः तपासून पाहत असे यानंतर विजयादशमी दिवशी सोनी लुटताना जो अंकुर जोमाने येतो तो अंकुर आपल्या डोक्यावरती असलेल्या फेट्यामध्ये किंवा टोपी मध्ये तुऱ्यासारखा रोवून आपल्या पिकाची जोमदार वाढ अप्रत्यक्षरीत्या दाखवली जाते अशी ही शेतकऱ्यांची प्रयोगशाळा म्हणजे भारतीयांचा प्राचीन व समृद्ध संस्कृतीचा उत्कृष्ट ठेवा म्हणावा लागेल.