तब्बल वीस वर्षानंतर भीमराव पांचाळ कोल्हापुरात..भाव,भावना, प्रेम, माया यांची एकत्रित परिभाषा देण्याचं काम गझल करते.
हीच गझल माणसाला जगण्याचं बळ देते. त्यातीलच महाराष्ट्राचे नावाजलेले गझलकार भीमराव पांचाळ यांच्या गझल कार्यक्रमाने मंत्रमुग्ध होणारे रसिक सगळीकडे आपण पाहतो.
त्याच भीमराव पांचाळ यांच्या गझल कार्यक्रमाचे आयोजन. प्रयोदी फाउंडेशनने कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये शब्दसुरांची भावयात्रा 17 ऑक्टोंबर 2023 रोजी सायंकाळी 6.00 वाजता होणार आहे.
अनेक सामाजिक, सांस्कृतिक ,कला, शैक्षणिक उपक्रमांनी प्रयोदी फाउंडेशन करवीरकरांना नवा विचार आणि संस्कृती देते.
तोच विचार भावनेच्या माध्यमातून देण्यासाठी हा कार्यक्रम फाउंडेशनच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित केला असल्याचं प्रयोदी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. योगिता प्र.कोडोलीकर व डॉ. प्रवीण कोडोलीकर यांनी सांगितलं.
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर हाच दसरा हसरा करण्यासाठी या गझल कार्यक्रमाचा आस्वाद करवीर नगरीच्या सर्वच रसिकांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
हा कार्यक्रम मोफत असून याच्या प्रवेशिका आजी माजी विद्यार्थी कृती समिती कार्यालय सायबर चौक कोल्हापूर येथे सकाळी 11 ते 6 वाजेपर्यंत उपलब्ध आहेत. ज्यांना या कार्यक्रमाच्या प्रवेशिका हव्या आहेत. त्यानी 9860919486 या मोबाईल नंबर वरती संपर्क करावा असं आवाहानही त्यांनी केलं.