कागल इथल्या महिलेचा राधानगरी ग्रामीण रुग्णालयात गर्भपात; प्रकरणी डॉक्टर सह चौघांना अटक

0
131

राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे

कागल इथल्या एका महिलेवर पतीने अनैसर्गिक संबंध ठेवले त्यातून संबंधीत महिला गर्भवती राहिल्याने तिच्यावर जबरदस्ती करून पती आणि नातेवाईकांनी तिला गर्भपात करण्यास भाग पाडले.

हा गर्भपात राधानगरी इथल्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आला.

संबंधीत महिलेनं स्वतः कागल पोलिसात फिर्याद दिलीय,शासकीय रुग्णालयात गर्भपाताची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडालीय.कागल पोलिसांनी संबंधीत डॉकटर आणि मदतनीसाला अटक केलीय.

पीडित महिलेनं दाखल केलेल्या गुन्ह्याचे कामात कोर्टात माघार घ्यावी यासाठी तिचा पती मुखतार जमादार याने पीडितेसी लग्न केलं.

तिच्यासोबत अनैसर्गिक संबंध ठेवले.त्यातून पिढीता गर्भवती झालेनंतर तिच्यावर जबरदस्ती करत ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे गर्भपात केला.

पती मुखतार जमादार,सासू यास्मीन जमादार,आणि पतीचा मामा आजीम हे संगनमत करून अपलेला नांदवत नसल्याची फिर्याद पिढीतेन कागल पोलिसात दिलीय.

कागल पोलिसांनी या प्रकरणी फिर्यादी यांचा पती मुख्तार जमादार आणि सासू यास्मिन जमादार यांना यापूर्वी अटक केलं होतं.

पोलिसांना चौकशीमध्ये ग्रामीण रुग्णालय राधानगरी इथं गर्भपात झाल्याचं समोर आलंय.

पोलिसांना तपासामध्ये फिर्यादी यांच्या गर्भपात संदर्भात ग्रामीण रुग्णालय राधानगरी इथं कोणतीही नोंद मिळून आली नाही.

वैद्यकीय अधिकारी स्त्री रोग तज्ञडॉ . दिग्विजय अभय पाटील, रा. शनिवार पेठ, कोल्हापूर हे गगनबावडा येथे बदली झाली आहे

तसेच सफाईकामगार राजू केशव चव्हाण, रा फेजीवडे, तालुका राधानगरी यांनी सदर गर्भपात बेकायदेशीररित्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

या दोघांना रात्री अटक करण्यात आली आहे.गर्भपाताची घटना शासकीय रुग्णालयात घडल्याने सर्वत्र खळबळ उडालीय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here