रानवारा ऍग्रो फार्म अँड रिसॉर्ट मध्ये नवरात्री दसऱ्यानिमित्त प्रवेश मोफत..

0
118

प्रतिनिधी : प्रियंका शिर्के- पाटील

कोल्हापूर पासून जवळच असलेले नवीनच सुरू झालेले रानवारा ऍग्रो फार्म अँड रिसॉर्ट कोल्हापूर पन्हाळा रोडवरील केरले पैकी मानेवाडी येथील आनंदी मंगल रोपवाटिका जवळ हे रिसॉर्ट आहे.या रिसॉर्टने नवरात्र उत्सवानिमित्त रविवार दिनांक 15 ऑक्टोंबर ते मंगळवार दिनांक 24 ऑक्टोंबर या नऊ दिवसांसाठी मोफत प्रवेश देऊन तरुणांसाठी परभणी उपलब्ध करून दिली आहे .त्यामुळे कोल्हापूर वाशीयांना या संधीचा फायदा घेण्याचे आव्हान रिसॉर्टचे मालक नितीन पारेख आणि संदीप माने यांनी केले आहे.या रिसॉर्ट मध्ये प्रवेश मोफत आहे पण खाद्यपदार्थाचे पैसे द्यावे लागणार आहेत.या रिसॉर्ट मध्ये 40 गेम त्याचबरोबर मनोरंजनात्मक अशा विविध आकर्षक खेळांची सोय आहे.तसेच रिसॉर्ट पार्किंग पासून ते रिसॉर्टच्या एन्ट्री गेट पर्यंत उंट सफारी घोडागाडी सफारी अशी सुविधा उपलब्ध आहे.टेन्ट मध्ये राहण्याची उत्तम सोय भोजनाची सुविधा ,स्विमिंग पूल, ट्रेकिंग आणि एडवेंचर ऍक्टिव्हिटीज टेंथ सुविधा अशा सुविधांचा रिसॉर्ट मध्ये मोफत आनंद लुटता येणार आहे.

महाविद्यालयातील शिक्षक, प्राथमिक – माध्यमिक शाळा विद्यार्थ्यांसाठी हे खास करून खास वन डे ट्रिप साठी एक उत्तम सुविधा उपलब्ध रिसॉर्टचे मालक नितीन पारेख आणि संदीप माने यांनी उपलब्ध करून दिले आहे.नवरात्रीच्या दिवसासाठी रिसॉर्टची वेळ सकाळी नऊ ते रात्री अकरा वाजेपर्यंत केले आहे.गरबा दांडिया खेळण्याची वेळ सायंकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत असणार आहे.नवरात्रीच्या सणानिमित्त रिसॉर्टमधील आनंद लुटण्यासाठी दिला जाणाऱ्या मोफत संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन आयोजक नितीन पारेख आणि संदीप माने यांनी केले आहे.तरी या संधीचा कोल्हापूर वाशीयांनी लाभ घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here