कोल्हापूर/डॉ.सुरेश राठोड
मौजे चिंचोली (ता.शिराळा) येथे एसपी-9 मराठी संचलित निर्भया महिला मंच व दै.रोखठोक अग्रवाल महिला मंचला मोठ्या प्रमाणावर महिलांचा प्रतिसाद मिळाला.
ग्रामपंचायत चिंचोली व समता महिला फाउंडेशन तळसंदे यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण 8 ते 13 ऑक्टोबर पर्यंत आयोजित करण्यात आले होते.
त्यावेळी या प्रशिक्षणाच्या सांगता समारोपा निमित्त संपादक डॉ.सुरेश राठोड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी डॉ.राठोड हे महिला मंच बदल माहिती देत म्हणाले, हा मंच महिलांच्या हक्काचे व्यासपीठ असणारा आहे.
या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा, संरक्षण, स्व प्रशिक्षण, आत्मसंरक्षण, ज्ञान, आरोग्य, कुटुंब नियोजन, परिसर, स्वच्छता, सामाजिक व आर्थिक नियोजन, स्टेज डेरिंग, वक्तृत्व, सांस्कृतिक खेळ व शिक्षण हे सर्व महिलांसाठी एकाच ठिकाणी हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी आम्ही हा मंच निर्माण करत आहोत,
असे म्हणाले. यानंतर महिलांसाठी विविध खेळ घेण्यात आले. त्यामधून चार भाग्यवान विजेत्यांना बक्षिसे वाटप करण्यात आली.
याचबरोबर लकी ड्रॉ ही घेण्यात आला व भाग्यवंत विजेत्यास देखील बक्षिसे देण्यात आली.
यानंतर चिंचोली गावच्या सरपंच कविता पाटील यांनी एसपी-9 मराठी चे आभार व्यक्त करत, स्पर्धेत विजेत्या झालेल्या महिलांना शुभेच्छा दिल्या व मोठ्या संख्येने सर्व महिलांनी या मंच मध्ये सभासद व्हावे असे आवाहन केले.
यावेळी चिंचोली गावातील सरपंच कविता पाटील, उपसरपंच रुपाली जाधव, ग्रा.पं.सदस्य संगीता चव्हाण, मंजुळा घोलप, माजी सरपंच संपतदादा जाधव, ग्रामसेवक योगेश नाईक, समता महिला फाउंडेशनच्या अध्यक्ष पदमा कांबळे, प्रशिक्षक जयश्री कुंभार, शोभाताई पाटील ,मोनिका पाटील, कोमल नागावकर, वैष्णवी कदम, गावातील प्रतिष्ठित नागरिक, व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.