प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र अभियानांतर्गत प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र अर्थात पीएम जीके विके या कौशल्य विकास विभागामार्फत ग्रामीण भागातील युवकांसाठी ग्रामपंचायत स्तरावर कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याकरता ग्रामपंचायत स्तरावर प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र मार्फत विविध कौशल्य आधारित कोर्सेस सुरू करण्यात येत आहेत.
सदर कौशल्य विकास केंद्र यांचे उद्घघाटन गुरुवार दि. 19 ऑक्टोबर रोजी व्हर्च्युअल / ऑनलाईन पद्धतीने सायंकाळी चार वाजता माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडत आहे.
ग्रामीण कौशल्य विकास केंद्र साठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 21 गावाकरिता निवड करण्यात आली आहे.
ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारी स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे यासाठी स्थानिक पातळीवरील रोजगार व स्वयंरोजगार करिता ग्रामीण भागात प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येत आहेत.
\
राधानगरी तालुक्यातून राधानगरी व राशिवडे बुद्रुक या ठिकाणी सदर ग्रामीण कौशल विकास केंद्र सुरू होत आहेत सदर कौशल्य विकास केंद्र मधून मल्टी स्किल टेक्निशन हा रोजगार उपलब्ध करून देणारा कौशल्य आधारित कोर्स सुरू करण्यात येणार आहे.
यासाठी राधानगरी येथील इनसाईट कॉम्प्युटर व राशिवडे बुद्रुक येथील ज्ञानदीप कॉम्प्युटर आणि टायपिंग इन्स्टिट्यूट या केंद्रांची निवड करण्यात आलेली आहे सदर केंद्रांचे समन्वयक राजेंद्र चव्हाण व दिलीप पाटील हे सदर कोर्स नियोजन करत आहेत.
यासाठी दहावी पास मुले मुली सहभागी होऊ शकतात सहा महिने चालणार कोर्स असून या साठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. सदर कौशल्य केंद्रावर सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर यांचे नियंत्रण राहणार असून ग्रामीण भागातील युवक – युवतींनी प्रवेश नोंदिण्यासाठी आवाहन सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.