पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे नवरात्र उत्सव निमित्त तालुका स्तरिय पोवाडा गायन स्पर्धेत विद्या मंदिर आळवे शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला. या वेळी तालुक्यातील पंचवीस शाळेनी सहभाग घेतला होता.
गाडाईदेवी मंदिर येथे या स्पर्धा संपन्न झाल्या. शाहीर कला परंपरा जपली पाहिजे या उद्देशाने व आपला छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा इतिहास जनतेला समजावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन सरपंच विक्रम कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या स्पर्धेत आळवे शाळेचे विद्यार्थी बालशाहीर श्रीराज गायकवाड यांच्या सह श्रावणी पाटील, देवयानी कांबळे,सानवी गायकवाड, पूर्वा लाड, गौरी पाटील, अवधूत पाटील, निरंजन यादव यासह वादक युवराज गायकवाड, आनंदा यादव, शिक्षक संजय पाटील, विलास कुंभार, दिनकर पाटील यांच्या सह सर्व शिक्षक यांनी सहकार्य केले. या वेळी मोठी बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेसाठी रघुनाथ चौगुले, माजी सभापती विकास पाटील, सरपंच विक्रम कांबळे, निवास चौगले,राजू परीट , प्रकाश पाटील, किरण मस्कर,सुशिल शेटे, प्रकाश पोवार, संजय पाटील, शंकर जाधव, संजय बचाटे आदी सह तालुक्यातील विद्यार्थी, गावकरी, पालक,व शाहीर उपस्थित होते.