कोल्हापूर: डॉ सुरेश राठोड
कुटुंबामध्ये मुले व संसारात व्यस्त असणाऱ्या महिलांना रास दांड्याच्या माध्यमातून एक उत्तम व्यासपीठ निर्माण करून देण्याचे काम भरारी फाउंडेशन कडून अनेक वर्ष नवरात्रोत्सवात होत आहे.
यापुढेही महिला सक्षमीकरण आणि आरोग्यासाठी या फाउंडेशनने सक्रिय राहावे, असे आवाहन एस.पी.9 मराठी न्यूज चॅनलचे संपादक डॉ.सुरेश राठोड यांनी केले.
कोल्हापूर मधील वनिता ढवळे, दीपिका जाधव, गायत्री राऊत, जया शिंदे, समृद्धी चौगुले यांनी भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून बालाजी गार्डन हॉल, नागळा पार्क येथे नवरात्र निमित्त रास दांडियाचे आयोजन केले होते.
यावेळी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते देवीचे पूजन करण्यात आले. यावेळी आमदार जयश्री जाधव, सौ व श्री महेश जाधव, आमदार उमाताई खापरे(पिंपरी चिंचवड), संपादक डॉ.सुरेश राठोड यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. दरम्यान उपस्थित युवती व महिलांनी रास दांडियाचा आनंद घेतला.
यावेळी बोलताना खासदार महाडिक म्हणाले, भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून वनिता ढवळे, जाधव, राऊत, शिंदे, चौगुले व शेलार या ट्रस्टीनी राबवलेले कार्य कौतुकास्पद आहे.
दांडिया सारख्या कार्यक्रमातून कला कौशल्याला वाव मिळतो. शिवाय उत्तम व्यायाम ही होतो. या संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन ही त्यांनी दिले.
तर आमदार जयश्री जाधव, महेश जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.
यानंतर सह-प्रायोजक रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी, महालक्ष्मी एंटरप्राइजेस, मे.के.जे.अग्रो, शुभांगी सारीज, रॉयल आर्ट कराओके, ड्रीम विषण, आशीर्वाद सिलेक्शन व के.आर.मोटर्स यांच्या प्रतिनिधीचे मान्यवरांच्या हस्ते व्यासपीठावरती सत्कार करण्यात आले.
यावेळी संग्राम भालकर व सहील भारती यांनी महिलांना दांडिया खेळासाठी प्रोत्साहन दिले, तसेच विविध सपर्धेचे बक्षीस वितरण उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.