मौजे शेंडूर ता कागल येथील जागरूक ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराचा मोठय़ा भक्तीमय वातावरणात नवरात्र उत्सव साजरा

0
106

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

कागल : मौजे शेंडूर ता कागल येथे जागरूक ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात गेली 9 दिवस मोठय़ा भक्तीमय वातावरणात नवरात्र उत्सव संपन्न होत आहे. रोज सकाळी व सध्याकाळी मोठय़ा भक्तीमय वातावरणात आरती केली जाते.

दररोज रात्री मंदिरात भएन मंडळाचा कार्यक्रम केला जातो, आज रविवार दिनांक 22 रोजी देवा जागर होत आहे . यावेळी आतिशबाजी केली जाते जागरा निमित भजन व मनोरंजनाचे कार्यक्रम पूर्ण रात्रभर केले जातात.

तसेच या वर्षी पासून नवरात्र काळात रोज सकाळी दुर्गा माता दौड अतिशय भक्ती भावात काढली या मध्ये गावातील तरुण मुलांनी व मुलींनी खूप मोठे प्रमाणत सहभाग नोंदवला , महिलांनी व आवाल वृद्धानी मोठय़ा प्रमाणात सहभाग भाग घेत दुर्गामाता दौड गेले ४/५ दिवसापासून चालू आहे .

या मुळे गावात भक्तीमय वातारण तयार झाले आहे.तसेच देवाला तेल घालण्यासाठी गावातील माघारणी व देवाचे दर्शन घेण्यासाठी गावामधे येत आहेत, या वर्षी ग्रामदैवत श्री सिध्देश्वराच्या पूजेचा मान श्री राजाराम गुरव, अवधूत गुरव, ओमकार गुरव याचे कडे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here