Kolhapur: महाराष्ट्र केसरीसाठी सिद्धनेर्लीत ४ नोव्हेंबरला जिल्हा संघ निवड चाचणी

0
60

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्यावतीने ६५ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी गटपदक कुस्ती स्पर्धा १६ ते २० नाव्हेंबर दरम्यान धाराशिव (उस्मानाबाद) येथे होणार आहे.

या स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघ पाठविला जाणार आहे. त्या संघाची निवड चाचणी ४ ते ५ नोव्हेंबर दरम्यान सिद्धनेली (ता. कागल) येथे गादी व माती विभागातील संघ निवड चाचणी घेतली जाणार आहे.



महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघ यांचे जिल्हा व शहर असे दोन संघ भाग घेणार आहेत. त्यासाठी संघाची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा शनिवारी (दि.४) व रविवारी (५) नोव्हेंबर दरम्यान गादी व माती विभागात घेतली जाणार आहे.

ज्या कुस्तीगीरांना फ्रीस्टाईल गटात गादी विभागात खेळायचे आहे त्यांनी गादी विभागाकडे वजने देणे व ज्या मल्लांना माती विभागात खेळायचे आहे त्यांनी माती विभागात वजने देणे बंधनकारक आहे.

सोबत औरीजनल आधारकार्ड, व त्याची झेरॉक्स, जन्मतारीखेचा- २००४ पर्यंत आवश्यक तसेच ज्यांची जन्मतारीख २००५ आहे त्यांनी मेडिकल सर्टीफिकेट व पालकाचे संमती पत्र आणणे आवश्यक आहे.

तरी कोल्हापूर जिल्ह्यातील मल्ल, कोच ,वस्ताद यानी नोंद घेवून जास्तीत जास्त मल्लांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्यावतीने केले आहे.

निवड चाचणी स्पर्धा अशी होणार

पुरुष वजन गट : ५७ , ६१ , ६५ , ७० , ७४ , ७९ , ८६ .९२ , ९७ व ८६ ते १२५ म .केसरी गट .
वजने शनिवार दि.४ रोजी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यत व लगेचच स्पर्धेला सुरवात होईल. तसेच ग्रिको रोमन व महिला गटाच्या स्पर्धा डिसेंबर २०२३ मध्ये होणार असलेने त्यांची निवड चाचणी रविवार दि. ५/११/२०२३ रोजी वजने सकाळी ८ ते ११ या वेळेत घेतली जाणार आहे.

महिला वजन गट : ४५ ते ५०, ५३ ,५५, ५७, ५९, ६२, ६५, ६८, ७२ व ६५ ते ७६ महिला म. केसरी

ग्रिको रोमन वजन गट : ५१ ते५५,६०,६३,६७,७२,७७,८२,८७, ९७ व १३० किलो

जन्मतारीख ग्रिको व महिला साठी :२००४ पर्यंत आवश्यक तसेच ज्यांची जन्मतारीख २००५ आहे त्यांनी मेडिकल सट्रीफिकेट व पालकाचे संमती पत्र आणणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here