कळंबा तलाव प्रश्नी आर.पी.आय (आ) चा कोल्हापूर प्राधिकरण कार्यालयावर हल्लाबोल. ..

0
115

प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी गायब अधिकारी मा. चव्हाण यांच्या. कार्यालयाला बांधले निवेदनाचे तोरण व नेम प्लेटवर हार घालून विरोधात घोषणाबाजी आणि निषेधाने कार्यकर्त्यांनी घातले थैमान.

ऐतिहासिक कळंबा तलावाची निर्मिती छत्रपती शाहूराजांनी परिसरातील जनतेला पाणी मिळावे या उद्देशाने केली.अनेक वर्ष परिसरातील जनतेला कळंबा तलाव अगदी मुबलक पाणी देण्याचे काम करतो.

हा तालाव उभा करत असताना शाहू महाराजांनी कळंबा तलावाला मिळणारे जलस्त्रोत ओढे,नाले यांना धोका पोहोचू नये व कळंबा तलाव प्रदूषित होऊ नये यासाठी तिथे असणाऱ्या बालिंगा गावचे स्थलांतर केले ते त्यांच्या दूरदृष्टीतून.

परंतु आज शाहू राजांच्या दूरदृष्टीला नाकारून प्राधिकरणाचे अधिकारी आणि तेथील बिल्डर्स नंदिनी जाधव नगराची निर्मिती करत आहेत. याची माहिती मिळताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.

त्यावर अजूनही कार्यवाही किंवा कोणताही ठोस निर्णय घेतला जात नव्हता. म्हणून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. चव्हाण यांच्याकडे या संदर्भात चर्चा करण्यासाठी गेले असता मा. चव्हाण उपस्थित नसल्याचे कार्यालयातील संबंधित अधिकारी यांनी सांगितले.

त्यांना फोनवरून संपर्क केला असता फोन देखील लागला नाही. अर्धा तास झाल्यानंतर कोणतीही प्रतिक्रिया मा.चव्हाण यांच्याकडून न आल्यावर कार्यकर्ते संतप्त झाले आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

कळंबा तलावाची ले आउटची मंजुरी तात्काळ रद्द झालीच पाहिजे, छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती नष्ट करणाऱ्या अधिकाऱ्याचा अधिकार असो, शाहूंच्या स्वप्नातला कळंबा तलाव सुरक्षित झालाच पाहिजे, प्राधिकरण अधिकाऱ्याचं करायचं काय खाली डोकं वर पाय. अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी कार्यालय परिसर दणाणून सोडला.

अनेक वेळ वाट बघूनही अधिकारी दखल घेत नाहीत हे कळाल्यावर निवेदनांचं तोरण करून ते तोरण त्यांच्या कार्यालयाच्या दाराला बांधण्यात आलं तर अधिकारी कायम गायब होतात त्यांच्या कार्यालयातच ठिय्या मांडायचा होता परंतु कार्यालयाची चावी ही त्यांच्याकडे असल्यामुळे कार्यकर्त्यांनी उत्तमदादांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांच्या नेम प्लेटला पुष्पहार घातला आणि चव्हाण या अधिकाऱ्याचा धिक्कार केला.

यावेळी तेथे संबंधित अधिकारी आल्यानंतर त्यांनी निवेदन आमच्याकडे द्या आम्ही साहेबांच्या पर्यंत पोहोचवतो असे सांगितल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले व जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. घोषणाबाजीचं हे रौद्ररूप पाहून पोलीस प्रशासनही त्या ठिकाणी दाखल झाले.

हे सगळे अधिकारी आणि तेथे आलेले नागरिक पाहत होते. त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. हे आंदोलन मागे घेण्यासाठी तेथील काही अधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांना पुढील बैठक होण्यासाठी पत्र देण्याचे आश्वासन दिले.

परंतु ते पत्र नाकारून जर का तात्काळ कळंबा तलावाच्या भोवती नागरी वस्ती वसवण्यासाठी दिलेले लेआउट ना मंजूर केले नाहीत तर मुख्य कार्यकारी अधिकारी व व संबंधित अधिकारी व कार्यालयाला सळोकी पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही आणि याची निश्चितच दखल घ्यायला भाग पाडू असा इशाराही यावेळी जिल्हाध्यक्षांनी दिला.

या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मिसाळ, जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडळीकर, मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय लोखंडे, सुभाष कांबळे,नामदेव कोथळीकर, प्रज्योत सूर्यवंशी, अमर कांबळे, संतोष कांबळे, साताप्पा हेगडे, निशिकांत कांबळे, अभिजीत कोगले,गणेश कावनेकर, अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here