SP9/ कोकरूड प्रतिनिधी
शिराळा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या आणि अल्पावधीत नावलौकिक मिळवलेल्या कोकरूड येथील शिवतेज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी अनिकेत अनिलराव देशमुख यांची व व्हा. चेअरमन पदी प्रतापराव शांताराम शिंदे यांची एकमताने बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी कोकरूड येथे पार पडलेल्या संचालक सभेत सहाय्यक निंबधक सहकारी संस्था शिराळचे कार्यालयीन अधिक्षक विकास माळी यांनी निवडून निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
यावेळी पतसंस्थेचे संस्थापक अनिलराव देशमुख, माजी चेअरमन तुकाराम घोडे, व्हा. चेअरमन राहुल भोई, निनाईदेवी कारखान्याचे माजी संचालक उत्तर गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पतसंस्थेचे संस्थापक अनिलराव देशमुख म्हणाले की, शिवतेज पतसंस्थेच्या प्रगती मध्ये आत्तापर्यंत होऊन गेलेले सर्व चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळाचे खूप मोठे योगदान आहे.
लवकरच संस्थेचे कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र कार्यक्षेत्र होणार आहे. सभासद , कर्जदार यांच्या सहकार्याने संस्थेची आदर्शवत वाटचाल सुरू आहे.
जनरल मॅनेजर विशाल माळी म्हणाले की, विधान परिषदेचे माजी सभापती स्व. शिवाजीराव देशमुख यांच्या आशीर्वादाने व युवा नेते सत्यजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे गेली 32 वर्षात नेत्रदीपक प्रगती साधली आहे.
संस्थेचे संस्थापक अनिलराव देशमुख यांच्या बहुमोल मार्गदर्शनमुळे संस्थेचे कोकरूड, चरण, शिराळा, मांगले या ठिकाणी शाखा विस्तार झाला आहे. संस्थेच्या ठेवी ८ कोटी १३ लाख , कजेॅ ७ कोटी ४० लाख, व खेळते भागभांडवल ९,७२,८२०४ आहे. यावेळी सर्व नुतन संचालक, चेअरमन, व्हा. चेअरमन यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नुतन संचालक तुकाराम घोडे, राहुल भोई, राजाराम जाधव, तानाजी पाटील, विठ्ठल नायकवडी, सोफियापरविन हवालदार, वासंती गावडे, किरण वाघमारे, श्रीपती सुतार माजी तज्ञ संचालक शंकर पाटील, माजी संचालक भिमराव सौदी, तोसिफ मकानदार, विकास वाघमारे संस्थेचे कोकरूड शाखा अधिकारी भगवान मस्कर, क्लार्क ओमकार पोतदार कॅशियर शुभम पोतदार बचत प्रतिनिधी राजेंद्र घोडे अशोक पाटील मारुती कुंभार मदतनीस दिलावर मुल्ला आदी उपस्थित होते. आभार शंकर पाटील यांनी मानले.