SP9/ कोकरूड प्रतापराव शिंदे
तळसंदे येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न डॉ डी वाय पाटील कृषी महाविदयालयातील कृषीकन्यांनी नागांव येथील प्रगतशील शेतकरी मारुती पाटील यांच्या शेतात जाऊन त्यांनी शेतात केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांचा आढावा घेत अभ्यास केला.
त्यांनी गेल्या 7 ते 8 वर्षापासून ऊसाची लागवड सेंद्रिय पद्धतीने (पाचट कुजवून , हिरवळीचे खत,गांडूळ खत, जिवाणू खते, शेणखताद्वारे) केली व त्यातून जमिनीचा पोत सुधारल्यामुळे दर्जेदार असा ९० ते ९५ टन उत्पादन होत आहे.
जि.प.कोल्हापूर अंतर्गत तालुका व जिल्हा पातळीवर सोयाबीन पीक स्पर्धेत सलग दोन वर्ष सहभाग, 2014 तालुका पातळी द्वितीय क्रमांक व 2015 जिल्हा पातळी प्रथम क्रमांक श्री. छ शाहू कारखान्याने घेतलेल्या ऊस पिक 2014 मधील स्पर्धेत द्वितीय क्रमांक , भिमाकृषि प्रदर्शनामध्ये 2015 साली शेतीभूषण पुरस्कार सन 2014 साली ऊस पिक स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त व भाजीपाल्यामध्ये फ्लॉवर पिक लागवड उत्तेजनार्थ क्रमांक शेतकरी पुरस्कार, कृषिगान 2015 नाशिक यांचा युवा शेतकरी पुरस्कार, आयडियल फाऊंडेशन नवी मुंबई यांचा आयडियल फार्मर पुरस्कार प्राप्त झाला.
2015 डॉ.डी. वाय पाटील शिक्षण संस्थेचे कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे . जि. कोल्हापूर यांचे कृषि व पशुसंवर्धनांतर्गत सोयाबीन पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे. आता एकरी 100 टनाच्या वरती उत्पादन घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत या प्रवासात त्यांचा पत्नी पल्लवी पाटील यांची मोलाची साथ आहे.
डॉ.एस.एम.घोलपे,प्राचार्य डी.एन.शेलार डॉ एन.आर.कडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राजक्ता फडतरे, पूजा रसाळ, राजनंदिनी इंगवले, भूमिती गावड, आर्या जरग, खुशिया मुलानी, श्रध्दा जाधव यांनी मारुती पाटील यांच्या शेतीला भेट देऊन त्यांच्याकडून आजपर्यंतच्या कृषी क्षेत्रातील वाटचालीची माहिती घेतली.