विनापरवानगी मिरवणुका : कोल्हापुरातील तीन मंडळांवर गुन्हे दाखल

0
71

कोल्हापूर : दुर्गा मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विनापरवानगी मिरवणुका काढून वाहतुकीला अडथळा केल्याबद्दल, तसेच आवाज मर्यादेचे उल्लंघन केल्याबद्दल लक्ष्मीपुरी पोलिसांनी तीन मंडळांवर गुन्हे दाखल केले.

यात रंकाळा स्टँड परिसरातील श्री महादेव तरुण मंडळ, लक्षतीर्थ वसाहत येथील शिवतेज तालीम मंडळ आणि सोमवार पेठेतील शिवभक्त बॉईज मंडळाच्या १८ कार्यकर्त्यांसह तीन ध्वनी यंत्रणा मालकांचा समावेश आहे.



गणेशोत्सवात विना परवानगी मिरवणुका काढून आवाज मर्यादेचे उल्लंघन केलेल्या मंडळांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतर, आता नवरात्रोत्सवातही पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन केलेली मंडळे रडारवर आली आहेत. महादेव तरुण मंडळ, शिवतेज तालीम मंडळ आणि शिवभक्त बॉईज मंडळाने बुधवारी (दि. २५) रात्री शहरातील प्रमुख मार्गांवर विना परवानगी विसर्जन मिरवणूक काढली.

मोठ्या आकाराचे स्ट्रक्चर उभे करून वाहतुकीला अडथळा केला. आवाज मर्यादेचे उल्लंघन करून नागरिकांना त्रास होईल असे वर्तन केले. याबद्दल पोलिसांनी तिन्ही मंडळांचे कार्यकर्ते आणि ध्वनी यंत्रणा मालकांवर गुन्हे दाखल केले.

यांच्यावर झाली कारवाई

रंकाळा स्टँड येथील श्री महादेव तरुण मंडळाचे अध्यक्ष शुभम किरण बामणे, उपाध्यक्ष निरंजन सुधीर आयरेकर, सचिव तन्मय मोहन सावेकर, उपसचिव मारुफ गुलामबक्ष मुजावर, सदस्य सत्यजीत शिवराज सूर्यवंशी (सर्व रा. रंकाळा रोड, कोल्हापूर) आणि ध्वनी यंत्रणा मालक दिग्विजय संभाजी चव्हाण (रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) यांच्यावर गुन्हा दाखल केला.

लक्षतीर्थ वसाहत येथील शिवतेज तालीम मंडळाचे अध्यक्ष अवधूत धर्मेंद्र तिवारे, उपाध्यक्ष राहुल बाळासो धुमाळ, सदस्य शरद सदाशिव पाटील, विशाल उत्तम कांबळे, शोएब सिकंदर गोलंदाज, सागर गजानन भोसले, आदित्य निवास साळुंखे (सर्व रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर), ध्वनी यंत्रणेचे मालक सौरभ पंडित संकपाळ (रा. साकोली कॉर्नर, कोल्हापूर) आणि सोमवार पेठेतील शिवभक्त बॉईज मंडळाचे अध्यक्ष प्रथमेश उमेश चव्हाण, उपाध्यक्ष सौरभ पोवार, सचिव अवधूत शिंदे, सदस्य ऋषिकेश पोवार, आर्यन पोवार, तुषार पोवार (सर्व रा. सोमवार पेठ, कोल्हापूर) ध्वनी यंत्रणा मालक सिद्धार्थ गोविंद मोरे (रा. सरवडे, ता. राधानगरी) यांच्यावर गुन्हे दाखल झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here