प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावात मनोज जरांगे उपोषणाला बसले होते आणि संपुर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले. १४ दिवसाच उपोषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरावली सराटी या गावात येऊन सोडवलं होत.
एक महिन्याचा कालावधीत मराठा आरक्षणा बद्दल भुमिका घेऊ असं आश्वास दिल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी उपोषण अखेर मागे घेतलं होत राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे.
त्या नंतर पुन्हा २४ ऑक्टोबर २०२३ पासून उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली होती.या उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती अत्यंत खालावली. राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
याच पार्श्वभूमीवर जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ उपोषण स्थळी दाखल झालं होतं. त्यानंतर त्यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून मराठा समाजाला टिकणार आरक्षण देण्यासाठी मुदत मागून घेतली आहे.
ही चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं असून राज्य सरकारला या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे.त्यानंतर राज्यात सुरू असलेलं आंदोलन शांत झालं आहे.
त्याचबरोबर उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत.तब्बल नऊ दिवस आमरण उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे. उपोषण स्थगित करत असताना जरांगे यांनी राज्य शासनाला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस तोडगा काढण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे.
यानंतर मनोज जरांगे उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहे. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आलेली असून त्यांच्या आरोग्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
९ दिवस आमरण उपोषण केल्यामुळे मनोज जरांगे यांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज आली असल्याची माहिती डॉ. विनोद चावरे यांनी दिली आहे. योग्य उपचार घेतल्यानंतर ते पूर्णपणे बरे होतील, असं देखील डॉ.विनोद चावरे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, मराठा समाजाचं आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चाललं होतं. याच पार्श्वभूमीवर राज्यात बहुतांश ठिकाणी घरफोडी, दगडफेक, रस्ता रोको आंदोलन आणि एस टी बसेस फोडण्यात आल्या होत्या.
त्यामुळे राज्यातील बहुतांश बस डेपोतून बस सेवा बंद करण्यात आली होती. अशात मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केल्यानंतर पुन्हा एकदा बस सेवा सुरू करण्यात आली आहे. पुणे आगाराने मराठवाडा आणि विदर्भात जाणाऱ्या बस पुन्हा एकदा सुरू करण्यांत आलेल्या आहेत.