प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
कागल :राज्यात यंदा पावसाचा फटका बसलेल्या भातशेतीतून उरलेसुरलेले धान्य आपल्या कणगीत पडावे यासाठी शेतकर्यांची लगबग सुरू झाली आहे.
कागल तालुक्यातील मध्ये चिमगांव शेतकऱ्याना मजुरांची कमतरता भासत असल्याने शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य कापणी, झोडणी, मळणी व बांधणीच्या कामाला आहेत. त्या शिवाय टु व्हिलरचा वापर करून चिमगांव परिसरात ठिक ठिकाणी मळणी काढली जात आहे.
छायाचित्रात दिसत असणारे चिमगांव मधील शेतकरी संभाजी ज्ञानदेव जाधव हे जुगाड करुन मजूर टंचाई वर उपाय म्हणून टू व्हिलर चा वापर करुन जमीनीवर पसरलेल्या भातावर गाडी फिरवून मळणी काढताना दिसत आहेत.
दरम्यान अनेक गंमतीजमती, गाणी, गात सुगीच्या शेवटच्या टप्प्यात भात कापणीची शेतकऱ्याची धादल चालू असल्याचे पाहयाला मिळत आहे.
शहरात नोकरी करणारा तरुण वर्ग सुट्टी काढून खासकरून शेतीच्या कामे अटपून घेण्यासाठी गावी आली आहेत. सुशिक्षित तरुणांना शेतीत रस निर्माण झाला असून शेतकामात आता शिकला सवरलेला वर्ग दिसून येत असल्याने कृषी क्षेत्रात हा सकारात्मक बदल म्हणावा लागेल.
अवकाळी पाऊसाचा फटका भातशेतीला बसू नये म्हणून शेतकरी मिळेल ते मनुष्यबळ वापरून कापणीचे काम आटपून घेत आहेत. अनेक ठिकाणी कापणी, काढणीच्या कामाला वेळेत मजूर मिळत नसल्याने सधन शेतकरी यंत्राच्या वापराने व जुगाड करुन कामे जलदगतीने आटपून घेत आहेत.
काही शेतकरी पारंपरिक पद्धतीला बाजूला सारत यंत्रसामुग्री चा वापर करीत आहेत. यामध्ये श्रम वेळ व पैसा बचत होत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी भात झोडणीच्या कामात व्यस्त झाला असून मळणी काढण्यासाठी भल्या पहाटे शेतात दाखल होत आहेत. भात कापणी, भात वाळवणे, पेंढ्याची उडवी रचणे या कामाला आता चांगलाच वेग आला आहे.