हायवे पोलिसांच्या त्रासातून प्रवाशांची मुक्तता करा….! सर्वपक्षीयाच कागलच्या तसिलदाराना निवेदन

0
586

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

कागल : येथील लक्ष्मी टेक येथे पुणे बेंगलोर हायवेवर, हायवे पोलीस दहा ते बारा जण एकत्र येऊन हायवेच्या मधोमध उभे राहून गाड्या आढवतात.सदर ठिकाणी लांब पल्याचा टेक असल्याने वाहनांचे स्पीड कमी असते याचा फायदा घेऊन, हायवे वरती गाडी अडवली जाते.

व पाठीमागून येणाऱ्या लोड च्या गाड्यांना नाहकपणे त्रासास सामोरे जावे लागते. परिणामी अपघात होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. विशेषता कर्नाटक मधून येणाऱ्या वाहनांना जाणीवपूर्वक आढवले जाते व विनाकारण कागदपत्रांची तपासणी केल्याचा बहाना केला जातो.


त्यामुळे महाराष्ट्रातील सीमा बांधव जेव्हा कर्नाटक मध्ये निपाणी, बेळगाव ,संकेश्वर येथे जातात त्यावेळी त्यांना देखील महाराष्ट्रातील हायवे पोलिसांच्या कारवाईचा उ्ठठे, कर्नाटक पोलीस काढतात.

त्यामुळे सीमा भागातील लोकांना दोन्ही राज्यांच्या सीमेवर प्रवास करताना प्रचंड त्रासात सामोरे जावे लागत आहे.
काही दिवसापूर्वी समृद्धी महामार्गावर पोलिसांनी अचानक अडवलेल्या गाडीला पाठीमागून येऊन ज्या गाडीने धडक दिली त्या अपघातामध्ये १३ जणांचा नाहक बळी गेला.

अशा घटना कागल मध्ये सुद्धा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता माननीय तहसीलदार साहेब यांनी या कारवाईमध्ये लक्ष घालून, परिवहन विभागास तात्काळ सूचना करून हायवे पोलिसांच्या होणाऱ्या त्रासापासून प्रवाशांची मुक्तता करावी.

अशा आशयाचे निवेदन माननीय कागल तहसीलदार यांना कागल मधील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी नुकतेच दिले आहे. निवेदनावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कागल शहर अध्यक्ष श्री संजय चितारी, (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट कागल तालुका अध्यक्ष) शिवानंद माळी , श्री संभाजीराव भोकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख, व श्री शिवाजी कांबळे (तालुकाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस ). यांच्या यांच्या वतीने माननीय तहसीलदार कागल यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले आहे. सदरच्या जनहितार्थ मागणीची दखल प्रशासनाने तात्काळ न घेतल्यास पुढील दिशा ठरवण्यात येईल असा सर्व पक्षीय अध्यक्षांनी इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here