कोल्हापूर : शासनाने ठरवलेली एफआरपी कोल्हापुरात ती एकरकमी दिली जाते. कोजन, इथेनॉल परताव्यातील नफा दिला जातो. अस्तित्वात असलेल्या सर्व कायद्यांचे कारखान्यांकडून पालन केले जात असताना अशी मागणी कितपत रास्त आहे.
यंदा हंगाम १०० दिवसांचा आहे, ९ महिने कर्मचाऱ्यांना बसून पगार द्यावा लागणार आहे. संकट मोठे आहे. त्यामुळे माझी माजी खासदार राजू शेट्टी यांना विनंती आहे की, आंदोलनाची ही वेळ नव्हे. कारखानदारांना सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ऊस दराबद्दल दोनवेळा व्यवस्थापकीय संचालक व शेतकरी संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळीदेखील कारखानदारांनी मागणीनुसार रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितले आहे.
एकीकडे कर्नाटक, सांगली, साताऱ्यातील साखर कारखाने सुरू झाले असताना कोल्हापुरातील कारखाने अजून बंद आहेत. यंदा ऊस कमी आहे, चार दिवसांवर दिवाळी आहे, त्याकाळात मजूर येणार कधी, हंगाम सुरू होणार कधी असा प्रश्न आहे.
एवढे दिवस गेल्यावर ऊस शिल्लक राहणार किती. त्यामुळए माझी राजू शेट्टींना पून्हा एकदा विनंती आहे की , आंदोलनाची ही वेळ बरोबर नाही. कारखानदांना त्यांनी सहकार्य करावे.