महायुतीच्या विजयाचा ट्रेंड कायम राहील, मंत्री हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास

0
74

कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तिप्पट जागा महायुतीने जिंकल्या आहेत. विजयाचा हा ट्रेंड असाच राहील. महायुती सरकारने अनेक जनाभिमुख निर्णय घेतले आहेत. गोरगरीब, सामान्यांच्या विकासासाठी काम करणारे हे सरकार आहे.

विधानसभा लोकसभेला जे उमेदवार ठरतील त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाची बाजी लाऊ अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ग्रामपंचायत निवडणुकीतील यशाबद्दल ते म्हणाले, कागल, चंदगड, राधानगरी, भुदरगडसह कोल्हापूर हा पूर्वीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार संघ राहीला आहे. अनेक वर्षे सत्तेवर असलेला हा पक्ष आहे. आमदार, कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीला मिळालेले हे यश आहे. शरद पवार गट निवडणुकीत अपयशी ठरला आहे यावर ते म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाची धुरा व नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आल्याने तशी परिस्थिती झाली असेल.

धुव्वा उडाला तरी चांगलेच..

चिंचवाडमध्ये खासदार धनंजय महाडीक गट व आमदार सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून एकत्रित निवडणूक लढवली पण त्यांचा धुव्वा उडाला यावर मुश्रीफ म्हणाले, या दोन्ही गटांनी पॅनेल केले हे शुभचिंतन आहे. भलेही त्यांचा धुव्वा उडाला असला तरी एकत्र आले ही चांगली गोष्ट आहे.

अजित पवार मुख्यमंत्री हाेण्यासाठी प्रयत्न करू..

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे यावर मुश्रीफ म्हणाले, आपला नेता मुख्यमंत्री व्हावा अशी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची इच्छा असते. आमचीही अशीच भावना आहे. पण त्यासाठी १४४ आमदार निवडून येणे गरजेचे आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांचा पंतप्रधान होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here