देशातील ५ राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून आज छत्तीसगडमध्ये मतदान होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतरत्न सचिन तेंडुलकरने छत्तीसगडमधील नागरिकांना मतदानाचं आवाहन केलंय. हर एक Vote जरुरी होता है, असे म्हणत सचिनने मतदारानां मतदान करण्याचं आवाहन केलंय.
निवडणूक आयोगाने मतदारांना आकर्षित आणि प्रोत्साहित करण्यासाठी क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकरची “राष्ट्रीय आयकॉन” म्हणून निवड केली आहे. क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर सचिन राजकीय मैदानात मतदारांसाठी बॅटींग करताना दिसतआहे.
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, ECI ने गेल्या वर्षी प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांची नॅशनल आयकॉन म्हणून निवड केली होती.
त्यापूर्वी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत माजी कर्णधार एम.एस. धोनी, अभिनेता आमिर खान आणि बॉक्सर मेरी कोम सारख्या दिग्गजांना देखील ECI ने राष्ट्रीय आयकॉन म्हणून निवडले होते.
यंदा निवडणूक आयोगाने सचिन तेंडुलकरची ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून निवड केली आहे. त्यामुळे, सचिन तेंडुलकरचा फोटो वापरुन मतदान जनजागृती केली जात आहे.