उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये कुत्रा चावल्यामुळे एका मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

0
68

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये कुत्रा चावल्यामुळे एका मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 28 ऑगस्ट रोजी या मुलाच्या पायाला कुत्र्याने चावा घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

त्यानंतर कुटुंबीय मुलाला एका खासगी डॉक्टरांकडे घेऊन गेले. टिटनेसचे इंजेक्शन घेतलं. पण काही दिवसांनंतर, मुलाचा पाय खूप दुखू लागला आणि नंतर खूप ताप आला.

मुलाच्या कुटुंबीयांनी त्याला जिल्हा रुग्णालयात नेलं. त्यानंतर त्याला दिल्लीला नेलं. पण तिथेही उपचार झाले नाहीत. कुटुंबातील सदस्य मुलाला घेऊन घरी आले. मुलाने विचित्र गोष्टी करायला सुरुवात केली. अखेर रविवारी त्याचा मृत्यू झाला. सोमवारी त्याच्या कुटुंबीयांनी गडमुक्तेश्वर येथे अंत्यसंस्कार केले. मुलाच्या मृत्यूने कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

हे प्रकरण मेरठच्या सूर्यपुरम कॉलनीचं आहे. येथे राहणारे धन्नू ट्रॅक सूट बनवणाऱ्या स्पोर्ट्स फॅक्टरीत काम करतात. 28 ऑगस्टला घराबाहेर खेळत असताना त्यांचा 11 वर्षांचा मुलगा दुष्यंत याला कुत्रा चावला. यानंतर कुटुंबीयांनी दुष्यंतला डॉक्टरांकडे नेलं आणि टिटनेसटचं इंजेक्शन दिलं. त्यावेळी मुलाला आराम मिळाला. पण नंतर दुष्यंतचा पाय पुन्हा दुखू लागला आणि खूप ताप आला.

दुष्यंतला त्यानंतर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले तेथून त्याला दिल्लीला रेफर करण्यात आले. कुटुंबाने दुष्यंतसोबत दिल्ली गाठली. मात्र तेथील डॉक्टरांनीही मुलाच्या शरीरात रेबीज पूर्णपणे पसरला असून त्याला वाचवता येणार नाही, असं सांगितलं. त्यानंतर कुटुंबीयांनी दुष्यंतला घरी आणून घरी उपचार सुरू केले. अखेर मुलाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here