प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर: अरुणाचल प्रदेश येथे जंगी फलटन फर्स्ट बटालियन मध्ये हवालदार पदावर कार्यरत असणारे कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथील संदीप हिंदूराव शिंदे (वय ४५ खडक गल्ली गारगोटी ता भुदरगड जि कोल्हापूर)यांचे अरुणाचल येथे कर्तव्य बजावत असताना ६ नोव्हेंबर २०२३ रोजी आकस्मिक निधन झाले होते.
आज ८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी त्यांचे पार्थिव कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे गांवी आणण्यात आले. शहीद जवान संदिप हिंदूराव शिंदे हे गारगोटी येथील खडक गल्ली येथील रहिवासी आहेत.
अरुणाचल येथे सेवेत कार्यरत असताना त्यांचे अकस्मिक निधन झाले. लवकरच ते सैन्य दलातून निवृत्त होणार ह़ोते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी ,दोन मुली,एक मुलगा असा परिवार आहे.
आज सकाळी त्यांचे पार्थिव गारगोटी येथे आणण्यात आले त्या नंतर गारगोटी येथे अंत्ययात्रा काढण्यात आली या मध्ये विध्यार्थ्यीचा सह भाग होता त्या नंतर त्याच्या देहाला आर्मी च्या जवानांच्या कडून मानवंदना देऊन भटअग्नी देण्यात आला यावेळी नागरिकांनी शहीद जवान अमर रहे च्या घोषणा दिल्या.