प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी कार्तिकी एकादशी साजरी केली जात आहे.
कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांना मिळतो.
परंतु, मराठा समाजाने ही पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यास विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने मोठा निर्णय घेतला.
कार्तिकी एकादशीच्या पूजेला उपमुख्यमंत्र्यांना न बोलावण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.
त्यानंतर मराठा समाजाने एक मागणी केली आहे. कार्तिकी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीची पूजा मनोज जरांगे यांनी करावी, असं मराठा समाजाने म्हटलं आहे.
उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाने एक मागणी केली आहे.
कार्तिकी एकादशी पूजेचा मान मनोज जरांगे यांना मिळावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी केली आहे.
कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा दरवर्षी उपमुख्यमंत्री करतात. मात्र, यंदा ही पूजा उपमुख्यमंत्र्यांनी करू नये, अशी भूमिका मराठा समाजाने मांडली आहे. यानंतर खरंच कार्तिकी एकादशीची पूजा मनोज जरांगे करणार का?
याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोन जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली होती.
तब्बल नऊ दिवस आमरण उपोषण केल्यानंतर राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने केलेल्या विनंतीवरून त्यांनी त्यांचं उपोषण स्थगित केलं.
त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस निर्णय काढण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. त्याआधी मनोज जरांगे येत्या १५ नोव्हेंबर पासून संपूर्ण राज्यभरात दौरे करणार आहेत.