सीपीआरमध्ये डॉक्टर, माहिती अधिकार कार्यकर्त्यात खडाजंगी

0
65

कोल्हापूर- येथील सीपीआर या शासकीय रूग्णालयामध्ये शुक्रवारी सकाळी डॉक्टर आणि माहिती अधिकारी कार्यकर्ता यांच्यात दुपारी खडाजंगी झाली. मात्र अधीष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी वाद थांबवून यातून तोडगा काढला.

माहिती अधिकारी कार्यकर्ते डॉ. संतोष कुलकर्णी यांनी गुरूवारी येथील राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका रूग्णावर शस्त्रक्रियेदरम्यानच्या विलंबाबद्दल गुरूवारी आक्षेप घेतला होता.

अशा शस्त्रक्रियेवेळी लागणारे आवश्यक साहित्य सुरूवातीला रूग्णाच्या नातेवाईकांना आणावयास सांगण्यात येते. शस्त्रक्रिया करून खरेदी प्रक्रिया राबवून चार, पाच दिवसांनतर ते पैसे नातेवाईकांना परत केले जातात.

याला कुलकर्णी यांनी आक्षेप घेतला. जर महात्मा फुले योजनेतून ही शस्त्रक्रिया होणार असेल तर खरेदी प्रक्रिया कशी राबवायची हा तुमचा प्रश्न आहे. परंतू नातेवाईकांनी आधी आपले पैसे घालून नंतर तुमच्याकडे पैशासाठी फेऱ्या मारत बसणे योग्य नव्हे अशी त्यांनी भूमिका घेतली. यावरून वाद घालून त्यांनी गुरूवारी शस्त्रक्रिया करूनही घेतली.

परंतू याबाबत शुक्रवारी अधीष्ठाता डॉ. गुरव यांच्या दालनात याबद्दल बैठक घेण्यात आली. यावेळी डॉ. संजय मोरे आणि कुलकर्णी यांच्यात खडाजंगी झाली. या सगळ्या प्रक्रियेत तुम्ही डॉक्टरंना टार्गेट करू नका असे माेरे म्हणत होते. मग तुम्ही रूग्णांकडून पैसे का घेता असे कुलकर्णी विचारत होते. यावेळी अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, डॉ. राहूल बडे, शिवसेना ठाकरे गटाचे मंजित माने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here