गाय वासरू व बैलजोडी शेतकरी मंडळ सडोली खालसा ता. करवीर यांचे वतीने दिवाळी वासूबारस सना निमित्त सडोली खालसा मध्ये सलग ७ व्या वर्षी ही वासूबारस हा सन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या वेळी गावातील सर्व जातीवंत गाई, डोंगरी काळी, काजळी खिल्लार, पंढरपूरी खिल्लार, गीर पंढरपूरी कळी गाय, आशा अनेक प्रकारच्या जातीवंत गाईचा व त्यांच्या कालवडी (वासरू) तसेच सर्व बैलजोडी यांचा या कार्यक्रमात समावेश होता.
या गाय वासरू व बैलजोडीचे पुजन व शोभायात्रा गावातून काढण्यात आली. या वेळी गावातील सर्व महिलांनी गाईची खणा नारळांनी, साडी चोळी बांधून पुजा केली तसेच हार व रंगीत रिबीन बांधून गाईना सजवले व त्यांचे औक्षण केले.
या कार्यक्रमाचे सर्व नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. रविंद्र मगदूम, व त्यांचे सहकारी राहुल शेलार, साहिल पाटील, रणजित पाटील, मकरंद पाटील ,दगडु साळोखे,दिनकर पाटील, प्रदीप कांबळे व त्यांच्या मंडळातील सर्व सदस्य यांनी केले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून या कार्यक्रमाची उद्घाटन
कोल्हापूर गोकुळ दुध संघाचे मा.चेरमन श्री. विश्वास पाटील साहेब (आबाजी) , शिरोली दुमाला सरपंच मा.श्री. सचिन पाटील, सडोली खालसा गावचे सरपंच श्री.अमित पाटील, महिला सदस्य सौ. संगिता मगदूम, ग्रामपंचायत सर्व सदस्य व गावातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या मध्ये अध्यापक श्रीकांत चव्हाण व सागर गायकवाड,मारुती साळोखे, शंकर पाटील, एकनाथ कुंभार सहकार्य लाभले.