बलभीम विकास संस्थेच्या २०१६ ते २०२१ संचालक मंडळाने भ्रष्टाचार केल्याची तक्रार – सभासद प्रकाश चौगुले,गौतम पाटील,सरदार बंगे,सागर चौगले यांनी सहकार निबंधकांकडे केली

0
69

कोपार्डे : खुपीरे (ता. करवीर) येथील बलभीम सेवा संस्थाच्या संचालक मंडळावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत सहकार न्यायालयात तात्कालीन अध्यक्ष, संचालक व इतर ५४ व्यक्तींच्या विरोधात वसुलीचे दावे दाखल आहेत.

चौकशीत सहायक निबंधक संभाजी पाटील यांनी गुळ ॲडव्हान्स व प्रशासकीय अहवालातील मुद्याने ४७ जणांवर ९० लाख ६३ हजार ३०६ रुपये अपहाराबाबत वैयक्तिक जबाबदारी निश्चित केली आहे. ही रक्कम १२ टक्के व्याजासह जमा करण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे.

बलभीम विकास संस्थेच्या २०१६ ते २०२१ संचालक मंडळाने भ्रष्टाचार केल्याची तक्रार सभासद प्रकाश चौगुले,गौतम पाटील,सरदार बंगे,सागर चौगले यांनी सहकार निबंधकांकडे केली होती.

तक्रारीच्या अनुषंगाने शासकीय लेखा परीक्षक अनिल पैलवान यांनी लेखापरीक्षण करून अपहार केल्या प्रकरणी दोन वर्षापूर्वी करवीर पोलिस ठाण्यात माजी अध्यक्ष व संचालकावर अपहाराची रक्कम वसुलीचे दावे दाखलही केले.

सहायक निबंधक संभाजी पाटील यांनी कलम ८८ अन्वये चौकशी सुरू केली. चौकशीत दाव्यातील गुळ ॲडव्हान्स पोटी अडत विभागाच्या धोरणानुसार गुळ ॲडव्हान्स देताना गुळ आवक व मूल्यांकनाबाबत खात्री करून ॲडव्हान्स अदा केलेला नाही, तत्कालीन संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी दक्षता न घेता गुळ ॲडव्हान्स रक्कम अदा केल्याने संस्थेच्या निधीचा गैर विनियोग केला आहे. गुळ ॲडव्हान्सच्या रक्कम या ॲडव्हान्स स्वरूपात दिलेल्या आहेत, ॲडव्हान्स रक्कम अद्याप वसूल झालेल्या नाहीत.

संचालकांनी लेखी खुलासे कोणत्याही कागदपत्राशिवाय मांडल्याने सादर केलेले म्हणणे ग्राह्य मानता येत नाहीत. त्यामुळे या रकमांची संचालक मंडळावर वैयक्तिकरीत्या जबाबदारी निश्चित करण्यात आल्याचा ठपका चौकशीत ठेवण्यात आला आहे.

कलम ८८ अन्वये निश्चित करण्यात आलेली संचालकावर ९० लाख ६३ हजार ३०६ रूपये रक्कम १२ टक्के व्याजासह संचालकांकडून वैयक्तिकरीत्या वसूल करण्यात यावी असे चौकशी अधिकारी पाटील यांनी अहवालात नोंदवले आहे.

  • गुळ ॲडव्हान्स रकमेतून केलेला अपहार – ७४ लाख ८८ हजार ५१
  • प्रशासकीय अहवालातील मुद्द्याचे अनुषंगाने वसुली रक्कम – १५ लाख ६४ हजार ७८८

संस्थेतील भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी दोन वर्षे लढा दिला. तत्कालीन संचालकांकडून व्याजासह ही रक्कम परत करण्याचे आदेश झाल्याने न्याय मिळाला आहे – प्रकाश चौगले (तक्रारदार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here