महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखचे मध्यरात्रीच कोल्हापुरात आगमन; फटाक्यांची आतिषबाजी अन् गुलालाच्या उधळणीत जल्लोषी स्वागत

0
101

कोल्हापूर: सिकंदर शेखने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत गतविजेत्या शिवराज राक्षेला अवघ्या २२ सेकंदामध्ये आस्मान दाखवत यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. मानाची गदा मिळवताच काल, शुक्रवारी मध्यरात्री तो कोल्हापुरातील गंगावेश तालमीत आला होता.

यावेळी पैलवान सहकाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी अन् गुलालाची उधळण करत त्याचे जल्लोषी स्वागत केले.

सिकंदरने कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत कुस्तीचे धडे गिरवले. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, विद्यापीठस्तरीय स्पर्धा गाजवल्या. वयाच्या २५ व्या वर्षी अनेक अनुभवी मल्लांना चितपट करण्याची किमया सिकंदरने साधली.

आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर कमी वयात सिंकदर आता महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कुस्ती पटावर चमकत आहे.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गतवर्षी त्याला अपयश आले होते. या लढतीवरून बराच वाद देखील झाला होता. मात्र यंदा सिकंदरने पराभवाची सल भरुन काढत अखेर महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळवली. विजयानंतर सिकंदरवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here