करिअरचा फक्त प्लॅन बी नव्हे तर सी आणि डी सुद्धा गरजेचाच…

0
58

राजेंद्र सावित्री सदाशिव मकोटे

सावित्री सदाशिव मकोटे ( एम ए – मराठी / राज्यशास्त्र / जैन – पाली भाषा, एम . जे . सी . ) प्रचंड प्रमाणात विज्ञानाने केलेली प्रगती माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोट आणि आजच्या ‘ कृत्रिम बुद्धिमत्ता ‘ या अंत्यत अफलातून तंत्रज्ञानामुळे प्रंचड बदल होत आहेत .

या प्रंचड वेगाने बदलाच्या या पार्श्वभूमीवर शाळेमध्ये शिकत असतानाच विद्यार्थ्यांनी करिअरचा बी नव्हे तर सी आणि डी प्लॅन करणे ही काळाची गरज बनलेली आहे .

एक मोबाईल तंत्रज्ञान आल्यानंतर मानवी नियमित वापरातील किमान दहा ते पंधरा प्रकारच्या वस्तू या अवघ्या वर्ष भरात कालबाहय झाल्या . बॅटरी – अलार्म घड्याळ – फोन नंबर लिहीलेली डायरी – पंचांग – डिक्सनेरी पासून अनेक वस्तू ह्या कारभारी ठरल्या आहेत .

एका मोबाईलने एवढ्या वस्तू दैनंदिन वापरातून बाहेर पडून शब्दश : कालबाहय झाल्या आहेत . या संदर्भात संवेदनशील अभिनेता अनुपम खेर चा एक व्हिडिओ हि अंर्तमुख करणारा असाच आहे .

फक्त गुणवत्ता नव्हे तर काळा प्रमाणे बदलण्याची लवचिकता नसल्यास एके काही प्रतिष्ठा – मोठे ग्लॅमर असणाऱ्या अनेकांना कालबाहय व्हावे लागले आहे . हे कटु पण वास्तव आहे .

मोटार – ऑटोमोबाईल क्षेत्रात तमाम मंत्रीगण यांची ओळख असणारी अम्बेसियटर , नवरदेवासाठी प्रतिष्ठीत समजली जाणारी बजाज चेतक दुचाकी, एके काळी सिलेब्रेटी आयकॉन असलेले एम . एम . टी . वॉच यासह भ्रमणध्वनी हॅण्डसेट ( मोबाईल ) विश्वात प्रांरभी दबदबा असलेले नोकिया कंपनीचे लवचिकता न स्विकारल्याने मार्केट मधूनच बाहेर पडून आता पुनः स्थान मिळविण्याची धडपड करत असलेले मोबाईल हॅण्डसेट ही काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत .

कृत्रिम बुध्दीमता ( आय टी इन्शुरन्स ) या नवीन येत असलेल्या तंत्रज्ञानामुळे हीच प्रतिक्रिया त्याहून अधिक गतिमानतेने सुरू राहण्याची शक्यता आहे आणि त्याची प्रथमता माध्यम मीडिया क्षेत्रात दिसून आली आहे .कृत्रिम अँकर वृत्त निवेदक – पेजिनेशन – ले आऊट आर्टिस्ट ते मुद्रीत शोधक अशा अनेक जागांवर आता माणसाच्या ऐवजी हे आधुनिक कृत्रिम तंत्रज्ञानच अधिक प्रभावीपणे कार्यरत राहणार आहेत .

या सह संरक्षण क्षेत्रापासून ते शेतीपर्यंत आणि कार्पोरेट क्षेत्रापासून ते विक्री व्यवस्थापनापर्यंत सर्व ठिकाणी अशी पर्यायी यंत्रणा उभी राहणार आहे . त्यामुळेच सर्व क्षेत्रातील ज्येष्ठ ते नवोदीत अश्या तीन ही पिढयातील सर्वांनीच या प्रंचड बदल करणारे तंत्रज्ञानाकडे वेळीच लक्ष देवून स्वतः सह सामुहीक बदलासाठी तयार राहणे हीच काळाची गरज आहे .

एका कवी ने नेमकेपणे आपल्या मुक्तछंद चारोळी रचने मधून हे व्यक्त केले आहे – ते असे – – – ‘ हल्ली प्रसिद्धी – जनसंपर्क चे मोल सर्वच जण जाणतात – – अवघे जग आभासी – मिथ्या असे ठामपणे सांगणारे प्रवचन – किर्तनकार – साधुगण ही आपले फोर कलर ब्रोशर – व्हीजिटीग कार्ड सह अधुनमधून रिल्स ही बनवतात .

मागील पिढीमध्ये एखादा शोध लागल्यानुसार तीस ते चाळीस वर्षे जवळ जवळ एक पिढी त्याचा प्रभाव राहात असे .मात्र सध्याच्या ग्लोबल व्हीलेज च्या युगामध्ये एक शोध हा दोन ते चार वर्षात कालबाह्य होत आहे .

मोबाईल हँडसेट ही पुढील काळात वापरावे लागणार नाहीत तर त्या ऐवजी चिप च शरीरात फीट करून मोबाईल ते कॉम्पुटर चे काम – वर्क अँट होम सह शब्दशः चोवीस तास करता येणार आहे .

इतपत तंत्रज्ञान प्रगत झाले आहे . वृत्तपत्र कागदा प्रमाणे घडी घालून कोठेही – कसेही वापरता येणारे मोबाईल आणि एलईडीची स्क्रीन आणि त्याचा सुरू झालेला वापर ही त्याचीच एक झलक आहे .

या पार्श्वभूमीवर नव नवीन बदल सत्वर स्विकारण्याच्या दक्षतेबरोबरच लवचिकताही अत्यंत गरजेची असणार आहे . तीच काळाची गरज ठरली आहे .उदाहरणार्थ मी पत्रकार होण्यासाठी म्हणून आज जर्नालिझम – मास कम्युनिकेशनची शिक्षण घेणारे विद्यार्थीयांनी अद्यावत आणि लवचिकता बाळगणे ही काळाची गरज राहणार आहे .

मी पत्रकार नाही झालो तर एनजीओ सह कॉपोरेट कंपन्यात जनसंपर्क अधिकारी होईन अथवा सोशल मीडियावर कंटेंट रायटिंग करेन यासह जाहिरात क्षेत्रामध्ये कॉपीराईटर होईल, आरोग्य क्षेत्रामध्ये आरोग्य शिबिरे संयोजक तसेच समन्वयक होईल ते नाही झालो तर लाँबी मॅनेजर -समन्वयक समुपदेशक म्हणून काम करेल ते नाही झालो तर स्वतः वेब पोर्टल काढून स्थानिक पातळीवर स्थानिक दुकानदार कार्यकर्ते यांचे इमेज बिल्डिंगचे काम करेन अशा विविध पैलूंनी कार्य करण्याची तयारी सर्व क्षेत्रातील सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी ठेवणे गरजेचे आहे त्यामुळेच कृत्रिम बुद्धिमत्ता पार्टी सध्या तरी संधी न होता एक मोठे आव्हान म्हणून स्वीकारणे गरजेचे आहे .

या तंत्रज्ञानाने तयार झालेली ‘कायरा ‘नावाची एक आभासी वृत्त निवेदिका आज दोन लाखाहून अधिक फॉलोवर्स बाळगते आहे यावरून मानवी जनजीवनात त्याचा होणारा त्याचे होणारी प्रचंड प्रमाणातील अतिक्रमण हे वेळीच ओळखणे गरजेचे बनले त्यामुळेच आयुष्याचा करिअरचा फक्त प्लॅन बी नव्हे तर आता सी आणि डी याचाही विचार आणि त्या दृष्टीने नियोजन हे गरजेचे आहे

आणि हे सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षक आणि त्याबरोबर पालकांनीही लक्षात घेऊन आपल्या विद्यार्थ्यांची त्याप्रमाणे त्याची मानसिक धर्म वाढवण्यासाठी आतापासूनच कार्यरत हे गरजेचे आहे कारण का उद्या फारच उशीर होऊ शकतो या विविध पैलूंनी कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान आपण स्वीकारल्यास ते अहवाल न राहता त्यामधून विविध संधीचाही शोध नक्कीच मानवी जनजीवन घेऊ शकते मात्र त्यासाठीची लवचिक आणि बदलती मानसिकता हे आज नवे आतापासून स्वीकारणे हीच काळाची गरजच बनलेली आहे . – – – – लेखन – – – राजेंद्र मकोटे – कोल्हापूर – महाराष्ट्र – भारत – भ्रमण संपर्क – 9881191220 – – मोहजाल संपर्क – मेल – r .seema34@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here