अणदुर येथे विमान पडल्याची घटना निव्वळ अफवा; सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे

0
181

Sp9 गगनबावडा – उत्तम पाटील

गगनबावडा तालुक्यातील अणदूर च्या जंगलात विमान कोसळल्याचा फोटो सोशल मीडियावर काल व्हायरल झाला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जिल्हा प्रशासन देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच कामाला लागले.

यावेळी प्रशासनाकडून मिळालेली माहिती अशी; अणदूर च्या जंगलात विमान कोसळल्याचा फोटो सोशल मीडियावर काल व्हायरल झाला होता. याबाबत गुगल लोकेशन पाहिले असता हा फोटो गगनबावडा तालुक्यातील अणदूर येथील दाखवत असल्याचे लक्षात आले.

विमान पडले असल्याचे दाखवत असलेल्या ठिकाणी घटनेची सत्यता पडताळण्यासाठी व शहानिशा करण्यासाठी लोकेशन पर्यंत जाऊन प्रशासनाने घटनेची खातर जमा केली असता ; त्यांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे विमान अथवा विमानाचे अवशेष तसेच इतर कोणतीही गंभीर बाब आढळून आली नाही.

त्यामुळे प्रशासना सह सर्वांनी सुटकेचा नि:श्र्वास सोडला . ऐन दिवाळीत वन विभाग तसेच पोलीस प्रशासनाला या अफवेचा चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. विमानाची प्रतिकृती फक्त गुगल मॅप वरच दिसून आल्याने या विमान दुर्घटनेच्या अफवेला पूर्णविराम मिळाला.

गगनबावडा तालुका डोंगराळ असल्याने झाडी – झुडपाणी विस्तारलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी जाण्यास वनविभाग व पोलीस प्रशासनास काट्याकुट्यातून वाट शोधत जावे लागले.

तर मागील काही महिन्यांपासून गुगल मॅप वर विमानाची प्रतिकृती दिसत असल्याचे काही नागरिकांकडून सांगितले जात आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे म्हणाले की,

“अणदुर या ठिकाणी विमान पडले असल्याची अफवा पसरवण्याचा खोडसाळपणा ज्यांनी केला आहे, त्यांच्यावर वेळीच कारवाई करण्यात येईल.”

यावेळी गगनबावडा तालुका सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश कांबळे, दिगंबर पाटील, सुशील गायकवाड, राजू पाटील, पोलीस पाटील आनंदा गुरव व सहकारी तसेच वनविभागाचे संभाजी चरापले, नितीन शिंदे, ओंकार भोसले, प्रकाश खाडे, शौकत महात, बाजीराव पाटील, राम पाटील तहसील विभागाचे कर्मचारी, तसेच दैनिक लोकमतचे पत्रकार चंद्रकांत पाटील व दैनिक तरुण भारतचे पत्रकार विजय पाटील यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here