शुक्रवारी दिनांक 17 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी आदरणीय मीना शेंडकर यांनी विद्यामंदिर आळवे शाळेस भेट देऊन शाळा निर्लेखन बाबत सुरू असलेल्या कार्यवाही संदर्भात विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था पाहणी केली .
एकंदर पाहणी केल्यानंतर समाधान व्यक्त करून आपल्या गावचे सरपंच आदरणीय डॉ. वसंत पाटील साहेब यांच्या धडाडी तसेच धडपडी बद्दल आणि गावातील सर्व तरुण वर्ग, शिक्षक आणि सर्व पुढारी यांच्यामार्फत जमवलेले निधी याबद्दल कौतुकास्पद उद्गार काढले..
पुढील आठवड्यात एंपथी फाउंडेशन कडे काम देण्या संदर्भात चर्चा करून शाळेसाठी चा निधी पुढील आठवड्यात वर्ग करण्याची कारवाई केली जाईल अशी शाश्वती दिली … यावेळी सरपंच वसंत पाटील साहेब, तानाजी पाटील, शिवाजी कुंभार सर ,ग्रामसेवक दाभाडे साहेब,कृष्णात पाटील, संजय गावडे सर, विनोद गुरव, अजित बंगे सर, अक्षय गुरव तसेच मुख्याध्यापक विलास कुंभार सर उपस्थित होते…