प्रतिनिधी : प्रियंका शिर्के पाटील
पन्हाळा तालुक्यातील एका छोट्याशा नदीकाठी वसलेल्या आळवे गावातील भैरवनाथ तालीम मधील मल्ल कुमारी पैलवान ऋणल सुरेश कदम हिची श्री छत्रपती शाहू क्रिडा प्रशाला शिंगणापूर येथे कुस्ती प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.
तिला तिच्या दररोजच्या सरावातिला तिच्या दररोजच्या सरावामुळे ही संधी तिला मिळाली आहे. फक्त पुरुषांनीच पैलवान की करावी असे काही नाही. महिला पण कशातच कमी नसतात हे तिने या निवडीच्या माध्यमातून दाखवले आहे.
या क्रीडा प्रकारामध्ये इतर मुलींनी भाग घ्यावा असे तिचे प्रेरणादायी काम दिसून येत आहे. ती एका सामान्य कुटुंबातील मुलगी आहे.तिच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे.
तिला मामा तानाजी कृष्णात चौगुले व आजोबा कृष्णात चौगुले यांची मदत मिळत असते.या तिच्या यशा पाठीमागे मार्गदर्शक प्रशिक्षक म्हणून वस्ताद आदिनाथ सखाराम बंगे हे मार्गदर्शन करत असतात. सर्व विद्या मंदिर आवळे शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक,गावचे सरपंच सर्व सदस्य व ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे तिला हे यश प्राप्त झाले आहे