पन्हाळ्याचे तत्कालीन बीडीओ सुभाष सांवत यांनी शासनाचे नियम डावलून पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च केला तसेच तालुक्यातील चार कोटींच्या कामांना मंजूरी दिल्याप्रकरणी
चौकशी समितीने शासनाच्या नियमाचे उल्लंघन केल्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांना सादर करत बीडीओ सावंत यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे….
प्रशासक असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांना पंधराव्या वित्त आयोगातील निधी खर्च करण्यास मनाई केली असताना पन्हाळा पंचायत समितीने चार कोटीच्या कामांना मंजूरी दिला प्रकरणी पन्हाळा पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.
कामामध्ये अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत २०२२-२३ मध्ये बंधित व अबंधित अशा १३७ कामांना 3 कोटी ४६ लाख १० हजार इतक्या रकमेचा प्रशासकीय आदेश, ७ लाखांच्या कामांना तांत्रिक मान्यता दिल्याचे चौकशीमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे ज्या ठिकाणच्या कामाना मंजूरी बीडीओ सावंत यांनी दिली होती. त्या स्थानिक स्वराज्य संस्थाची चांगलीच गोची झाली आहे….