वाघापूर येथे सत्तारूढ श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी यांचा प्रचार शुभारंभ

0
133

प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील

वाघापूर येथे बिद्री साखर कारखाना निवडणूकीचा श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी चा प्रचार शुभारंभ करण्यात आला.यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील , पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ, माजी आमदार संजय घाटगे, माजी आमदार बजरंग देसाई,माजी आमदार दिनकरराव जाधव प्रमुख उपस्थितीत होते.
या प्रसंगी चेअरमन के पी पाटील म्हणाले बिद्री कारखाना राज्यात प्रथम क्रमांक मध्ये आणला.दरवर्षी 28 टक्के बोनस कर्मचाऱ्यांना दिला .सभासद करताना मी कोणत्या गटाचा आहे हे बघितल नाही.

आमदार आबिटकर यांनी इथेनॉल प्रकल्प अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न केले. तर ए वाय पाटील आपल्यातून चेअरमन पदासाठी विरोधात गेले. पण लढाईत मी मागे पडणार नाही .बिद्री वाचली पाहिजे यासाठी या आघाडीला प्रचंड बहुमताने निवडून द्या..
काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील म्हणाले आजची समोरील गर्दी बघतली तर विजय नक्की आपला आहे .हा कारखाना के पी पाटीलच सक्षम पणे चालू शकतात .चागल्या व्यक्तीच्या ताब्यात बिद्री कारखाना असावा ही सभासदांची इच्छा आहे.

महाराष्ट्र राज्यात बिद्री कारखाना प्रथम क्रमांक मध्ये येत आहे.मी आणि मुश्रीफ आपल्या पाठीशी आहे यामुळे विजय आपला निश्चित आहे. असे म्हणताच टाळ्यानी उपस्थितानी दाद दिली पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले बिद्री चांगली चालवायची असेल तर कारखाना सभासदांनी के पी पाटील यांच्या ताब्यात द्यावा .


यावेळी गोकुळ चेअरमन अरुण डोंगळे, गोकुळ संचालक अमरीश घाटगे ,गोकुळ माजी संचालक धैयशिल देसाई,माजी संचालक धोंडीराम मगदूम, सचिन घोरपडे , धैयशिल पाटील कौलवकर ,वाघापूर सरपंच बापुसो आरडे उपस्थित महिला व पुरुष सभासद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here