देशात लवकरच समान नागरी कायदा

0
98

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे संकेत

‘राम मंदिर, तीन तलाक, कलम ३७० नंतर हेच उरले’

भोपाळ : वृत्तसंस्था

देशात लवकरच समान नागरी कायदा सिव्हिल कोड) लागू होईल, अशी शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तसे स्पष्ट संकेत आपल्या भोपाळ दौन्यात शनिवारी दिले.

राम मंदिर, कलम ३७० आणि तीन तलाकसारख्या विषयांवर निर्णय घेऊन झाले आहेत, आता समान नागरी कायद्याचा विषय उरला आहे. तोही मार्गी लावला जाईल. तशी वेळही आली आहे, असे भाजप कार्यालयात कोअर कमिटीच्या बैठकीत शहा यांनी

सांगितले.

प्रोजेक्ट म्हणून समान नागरी कायदा लागू केला जात आहे. मसुदा तयार झालेला आहे. जे काही राहिलेले काम आहे, तेही पूर्ण केले जाईल. तत्पूर्वी, राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना उद्देशून, देशात सर्व ठिक चाललेले आहे ना, अशी विचारणा शहा यांनी केली. यानंतर समान नागरी कायद्याबाबत चर्चा केली. निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे अध्यक्षपद

राहुल गांधी यांना दिले जाईल; पण

यामुळे चिता करण्याचे कारण नाही. काँग्रेस आणखी खाली येणार आहे अशी टीका शहा यांनी केली.

बैठकीला प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित होते. सीमा सुरक्षा दलाच्या विमानाने शहा दिल्लीला परतले. त्यांच्यासह ज्योतिरादित्य शिंदे, खासदार राकेश सिंहही रवाना झाले. काय आहे समान नागरी कायदा?

हा कायदा लागू होताच विवाह, फारकत, वारसा, दत्तक विधानासारख्या बाबी एका समान कायद्यांतर्गत येतील. यात धर्म, पंथाच्या आधारावर अन्य न्यायालय वा इतर व्यवस्था नसेल. राज्य घटनेच्या कलम ४४ अंतर्गत कायदा लागू होईल. हा कायदा केंद्रा सरकार संसदेत निर्णय घेऊन लागू करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here