रामानंद सागर यांच्या ‘श्री कृष्णा’ (Shri Krishna) या लोकप्रिय टीव्ही मालिकेत असे अनेक अभिनेते होते, ज्यांना आज लोक त्यांच्या खऱ्या नावांपेक्षा त्यांच्या पात्रांच्या नावांनी ओळखतात.
या मालिकेतून काही कलाकारांना स्टारडम मिळाले, तर काही काळानंतर अज्ञात झाले. पण असाच एक कलाकार आहे, ज्याला आता अॅडल्ट वेबसीरिजमध्ये काम करण्याची वेळ आली आहे. हा अभिनेते म्हणजे तारकेश चौहान.
त्यांनी ‘श्री कृष्ण’मध्ये महाभारतातील धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती. बी.आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’मध्येही काम केले. पण आज त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. तारकेश चौहान (Tarkesh Chauhan) यांना अॅडल्ट वेब सीरिजच्या जगात ‘बाबूजी’ किंवा ‘सासरे’ म्हटले जाते.
धृतराष्ट्राच्या भूमिकेत जेव्हा तारकेश चौहान झळकले होते तेव्हा त्यांनी सगळ्यांच्याच मनाचा ठाव घेतला होता. तारकेश चौहान यांनी आपल्या प्रतिभेने अंध धृतराष्ट्राच्या भूमिकेला जीवदान दिले होते.
ते रडले तेव्हा प्रेक्षकही रडले. धृतराष्ट्राच्या व्यक्तिरेखेने तारकेश चौहान यांना यशाची चव चाखायला दिली जी त्यांना त्यांच्या कारकिर्दीत पुन्हा कधीही चाखायला मिळणार नाही.
या मालिकेत केलं काम
तारकेश चौहान यांनी ७०-८०च्या दशकात आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ‘तुम्हारे सहारे’ या टीव्ही शोमधून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर त्यांनी अनेक मालिका केल्या.
‘महाभारत’मध्ये ते पांडवाच्या भूमिकेत दिसले होते. त्यांच्या जवळपास प्रत्येक वेब सीरिजमध्ये तारकेश चौहान बाबूजी म्हणजेच सासऱ्यांच्या भूमिकेत दिसले. प्रत्येक वेब सीरिजमध्ये तारकेश चौहान यांचे अनेक इंटिमेट सीन्स आहेत.
तारकेश चौहान यांनी ‘बालिका वधू’, ‘तेनाली राम’, ‘दुर्गा’ आणि ‘ये है आशिकी’ यांसारख्या मालिकांमध्येही काम केले. बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ आणि रामानंद सागरच्या ‘अलिफ लैला’ या मालिकेतही ते दिसले होते.