SP9/ कोकरूड प्रतिनिधी
अंत्री ब्रुद्रक ता. शिराळा गावचे सुपुत्र व अमरदीप शिक्षण संस्था भाईंदरचे संस्थापक पै.वसंतराव यशवंत पाटील यांना दिल्ली पॅरामेडीकल बोर्ड आणि कालीचरण फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा भारत गौरव हा पुरस्कार माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा, खासदार जयंत चौधरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कार्यक्रम इंडियन इस्लामिक कल्चरल सेंटर, लोधी नवी दिल्ली येथे संपन्न झाला.
यावेळी आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज, माजी विधानसभा अध्यक्ष डॉ. योगानंद शास्ती, अध्यक्ष पॅरामेडीकल बोर्ड परदीप अग्रवाल, उपमहापौर डॉ. आले इक्बाल, हिंदकेसरी जगदीश कालीरमन यांची प्रमुख उपस्थिती होती.
पै. वसंतराव पाटील यांनी मिरा भाईंदर येथे महानगरपालिकेच्या सहकार्याने श्री. गणेश कुस्ती आखाड्याची स्थापना केली. या माध्यमातून कुस्ती खेळाडूंना तंत्रशुद्ध मार्गदर्शन देण्याचे काम ते करित आहेत.
या तालमील अनेक पैलवानांनी जिल्हा, राज्य राष्ट्रीय स्पधेॅत यश मिळवले आहे. पै.वसंतराव पाटील हे सामाजिक बांधिलकी भावनेतून राबवित असलेल्या क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. या मिळालेल्या पुरस्काराबद्दल वसंतराव पाटील यांचे मिराभाईंदर तसेच शिराळा तालुक्यातून विशेष अभिनंदन होत आहे.