कोल्हापूर : २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधानाच्या स्वीकृती दिनानिमित्त लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने ऐतिहासिक बिंदू चौक कोल्हापूर येथे संविधानाच्या प्रास्ताविकेचे नागरिकांना मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी लोकराज्य जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल चव्हाण, लोकराज्यचे सरचिटणीस शशिकांत जाधव, संघटक बाळकृष्ण गवळी, सुरेश जाधव, कार्याध्यक्ष अमोल कांबळे,कृष्णात सातपुते , शाहीन बारगीर,सर्जेराव भोसले, विजय केसरकर, संतोष बिसुरे, निवृत्त पोलीस अधिकारी आर.आर.पाटील,रघुनंदन सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना लोकराज्यचे संस्थापक अध्यक्ष अनिल चव्हाण म्हणाले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील विविध देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून भारतातील विविध जाती- धर्मियांना न्याय मिळवून देणारी भारताची राज्यघटना लिहिली.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधानाचा देशाने स्वीकार केला. आजचा दिवस हा देशाच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण आहे. त्याचे पावित्र्य सर्वांनी राखले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.