कारमधून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक, ३४ लाखाचा मुद्देमाल जप्त; चालक पसार

0
46

तालुक्यातील नापणे येथे एका आलिशान कारमधून गोवा बनावटीची दारू वाहतूक करत असताना एक कार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कणकवली पथकाने पकडली. ही घटना शुक्रवारी रात्री १:३० वाजण्याच्या सुमारास घडली.

यामध्ये गोवा राज्यनिर्मित विदेशी मद्य रु. ५,५५,१२०/- किंमतीच्या मद्य साठ्यासाह एक चार चाकी वाहन असा सुमारे ३४,५५,१२०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या कार क्रमांक (एम एच ०९ ईके- ६७६९)ला इन्सुली चेकपोस्ट येथे तपासणीसाठी थांबविण्यासाठी इशारा करण्यात आला होता.

मात्र चालकाने पथकाला हुलकावणी देत पुढे वेगाने निघून गेला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कणकवली पथकास याची माहिती देवून सदरची कार थांबविण्याची मागणी केली. त्यानुसार कणकवली विभागाने व तपासणी नाका येथील पथकाने संयुक्तपणे कारचा पाठलाग केला.

मात्र, कार चालकाने मुंबई गोवा महामार्गावरून खारेपाटण व तेथून परत वैभववाडीच्या दिशेने कार पळवली. पथकाने कारचा पाठलाग सुरूच ठेवला. नापणे रस्त्याला रस्ता अरुंद असल्याने चालकाने आजूबाजूच्या जंगलमय भागाचा व काळोखाचा फायदा घेवून कार तिथेच सोडून पळ काढला. यावेळी पथकाने कारमधून गोवा राज्य बनावटी दारुचा मुद्देमाल जप्त करुन वाहन ताब्यात घेतले.

ही कारवाई वैभव व्ही. वैद्य, अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनानुसार निरीक्षक प्रभात सावंत, एस. डी. पाटील दुय्यम निरीक्षक, प्रदिप रास्कर, दुय्यम निरीक्षक, तपासणी नाका – गोपाळ राणे सहाय्यक दुय्यम निरीक्षक, सुरज चौधरी सहाय्यक दुय्यम निरीक्षक, रणजित शिंदे जवान वाहनचालक, महिला जवान स्नेहल कुवेसकर, यांनी सहभाग घेतला होता. याबाबत पुढील तपास संतोष पाटील, दुय्यम निरीक्षक कणकवली करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here