बॉलिवूडची चांदनी अर्थात अभिनेत्री श्रीदेवी. सौंदर्यानं आणि अभिनयानं श्रीदेवी यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आपली वेगळी छाप पाडणाऱ्या श्रीदेवीचं २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुर्दैवी निधन झालं.
त्याचं जाणं हे बॉलिवूड सिनेसृष्टीसाठी मोठा धक्का आणि कधीही न भरून येणारी पोकळी होती. श्रीदेवीच्या आकस्मिक निधनाने अवघ्या मनोरंजन विश्वालाच मोठा धक्का बसला होता. गेल्या काही दिवसांपासून श्रीदेवी यांच्यावर बायोपिक येणार अशी चर्चा सुरु होती. यावर बोनी कपूर यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
देवीच्या आयुष्यातील आणि कारकिर्दीतील ठळक पैलू उलघडणारा बायोपीक यावा, अशी चाहत्यांची इच्छा आहे. आता बोनी कपूर यांनी याविषयी चाहत्यांना माहिती दिली आहे. श्रीदेवीवर कधीही बायोपिक बनवणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, ‘मी तिच्यावर कधीही बायोपिक बनवणार नाही. तिच्या जीवनावर चित्रपट बनवण्याच्या अनेक ऑफर मला आल्या, पण मी त्यासाठी तयार नाही. ही माझ्यासाठी अत्यंत वैयक्तिक बाब आहे’.