श्रेयस तळपदे प्रस्तुत ” मर्दिनी ” द्वारेमोठ्या पडद्यावर उलगडणार नारी सामर्थ्याची गाथा !

0
4

प्रतिनिधी : प्रमोद पाटील

कोल्हापूर- प्रत्येक स्त्रीतील मर्दिनीला जागं करणारा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘मर्दिनी’ आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नारीशक्तीचा प्रभावी आणि प्रेरणादायी आविष्कार असलेला हा सिनेमा ३ जुलै २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाच्या या नव्या पोस्टर मध्ये एक ठाम पाऊल, उग्र रूप आणि ज्वालांनी वेढलेलं नाव ‘मर्दिनी’ पाहायला मिळतं.
सामान्य चौकटी मोडत, स्त्रीच्या संयम, संघर्ष आणि आत्मबळाचा ठसा उमटवणारा ‘मर्दिनी’ भावनांना स्पर्श करणारा आणि मनाला प्रश्न विचारायला लावणारा अनुभव देईल असा दिसतोय.
प्रार्थना बेहेरे, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी, राजेश भोसले यांसारख्या
प्रमुख कलाकारांच्या सशक्त अभिनयासोबत बालकलाकार मायरा वैकुळ हिची भूमिका कथेला एक वेगळी भावनिक उंची देते.
अजय मयेकर यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट असून, दिप्ती तळपदे यांच्या निर्मितीखाली ‘मर्दिनी’ साकारला जात आहे. तर सह निर्माती टिना राकेश कोठारी, छायांकन शब्बीर नाईक, संकलन अभिषेक शेठ, संगीत हितेश मोडक, पटकथा आणि संवाद महाबळेश्वर नार्वेकर यांनी केले आहे.
ताकदीला आवाज आणि धैर्याला दिशा देणारा ‘मर्दिनी’ ३ जुलै २०२६ पासून प्रदर्शित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here